पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी)
आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट संचलित धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आनंदगड वीरगावच्या विद्यार्थ्यांनी २०२४-२०२५ या वर्षातील रंगोत्सव सेलिब्रेशन या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत कला गुणवंत पुरस्कार,उत्कृष्ट कला पुरस्कार यांसह १५ सुवर्णपदक १० रौप्य पदक व ७ कास्यपदकांची कमाई करत त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेमध्ये ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता ,३६ विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणाला लावत यश संपादले.
गौरव देशमुख ,लावण्या बागुल, कार्तिक ताजणे, श्रेया आंबरे, चैत्राली काकड, प्रतीक्षा टोपले, अन्वी गायकवाड , वेदांती मांडे, स्नेहल वर्पे, निलेश मोहकरे, श्रेयश वाळे, काव्या देशमुख, आर्या दळवी, सारा जहागीरदार, रविराज दराडे, फाइजा जहागीरदार , जान्हवी देशमुख, सार्थक हासे, परी जाधव, दिपाली गोडे, सृष्टी जाधव, पूजा भुतांबरे, दिक्षा थवील, रिया सदाकाळ , स्नेहल चौधरी, अनुष्का भांगरे, हर्षद चारोडे, मयूर महाले, मनस्वी थोरात, ब्रह्मेश आहेर, निशा पथवे, निर्जला कांबडी आदी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत यश मिळवले आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री आकाश वर्पे यांचे मार्गदर्शन लाभले असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आनंदगड शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सचिव डॉ. अनिल रहाणे, संचालिका सौ. सुप्रिया वाकचौरे, सौ.गीता राहणे, प्राचार्य किरण चौधरी,अधिक्षक रवींद्र आंबरे, कॅम्पस डायरेक्टर संदीप थोरात, सुपरवायझर अलका आहेर, अंजिरा देशमुख, प्रियंका सोनवणे, वीरगाव येथील विविध संस्थांचे पदाधिकारी आनंदगड शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

