पुण्य वार्ता
डोंगरगाव प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील भानुदास जबाजी उगले यांच्या पत्नी कै. सौ. रत्नाबाई भानुदास उगले यांचे दि. 10/10/2024 रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 72 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी डोंगरगांव आढळातीरी दुपारी 3:30 वाजता शोकाकुल वातावरणात पार पडला. यावेळी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सर्व डोंगरगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात त्यांचे पती भानुदास उगले, मुलगा रावसाहेब भानुदास उगले,2 मुली तसेच दीर, जावा, पुतणे, सूना, नातवंडे, पतवंडे व आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे. या आज्जीचा दशक्रिया विधी शनिवार दि.19/10/2024 रोजी सकाळी 8 वाजता डोंगरगाव आढळातिरावर शनैश्वर व भोलेश्वर विसावा आश्रम येथे होईल. तसेच यावेळी ह.भ.प. रमेश महाराज कानवडे यांचे प्रवचन होणार आहे.



