पुन्य वार्ता
नेवासे शहर ता.३१
दिवाळी निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून नेवासा येथील पत्रकारांचा साखर व मिठाई भेट देऊन सन्मान करण्यात आला.पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी व आपल्या कथा व व्यथा सरकारला समजण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने लढा सूरु केला असून आपण ही आपपल्या लोकप्रतिनिधीना पत्रकारांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी आग्रह धरावा असे आवाहन
राज्य सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांनी बोलतांना केले.
यावेळी नेवासा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड यांच्या हस्ते राज्य सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित पत्रकारांना डॉ.आरोटे यांच्या हस्ते मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलतांना डॉ.विश्वासराव आरोटे म्हणाले की पत्रकारांच्या व्यथा सरकारला समजण्यासाठी राज्यभर संवाद यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने संवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील २८ जिल्हयातील २३८ तालुक्यात जाऊन जनजागृती केली आहे,पत्रकार हा दिवसरात्र आपल्या वास्तववादी लिखाणाच्या माध्यमातून समाजाला जागृत करत असतो मात्र ग्रामीण भागातील पत्रकारांना म्हणाव्या तशा सुविधा व योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली
ग्रामीण भागातील पत्रकार हा उपेक्षित जीवन व्यथित करत असून ही वस्तुस्थिती असून ती बदलण्यासाठीच राज्य पत्रकार संघ लढा देत आहे,आपल्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी स्थानिक पत्रकारांनी देखील आमचा प्रश्न सरकार दरबारी मांडावा यासाठी लोक प्रतिनिधीकडे मागणीद्वारे आग्रह धरावा जेणेकरून याचे पडसाद विधानसभेत उठतील,अधिस्वीकृती धारक पत्रकारांप्रमाणेच ग्रामीण भागातील पत्रकारांना देखील शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे त्यासाठीच राज्य पत्रकार संघाचा प्रयत्न असून आपण ही आता काळाची गरज ओळखून संघटित व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या दिवाळी शुभेच्छा भेट वस्तू प्रदान कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संगमनेर तालुकाध्यक्ष संजय पोकळे,नेवासा तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड,जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण,कैलास शिंदे, शाम मापारी,सुहास पठाडे,मकरंद देशपांडे,युनूस पठाण,पवन गरुड, खबरनामाचे संपादक ऋषभ तलवार,
संपादक आबासाहेब शिरसाठ, अशोक तुवर,बाळासाहेब पंडित,आदेश जावळे,बाळासाहेब पिसाळ,विकास बोर्डे, राहुल चिंधे उपस्थित होते.पत्रकार मोहन गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.


