पुन्य वार्ता
ब्राम्हणवाडा (प्रतिनिधी) :
यशोमंदिर पतसंस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत संस्थापक पॅनलने दणदणीत यश संपादन करत संस्थेवर आपली मोहोर उमटवली. या निवडणुकीनंतर चेअरमन पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत भानुदास आरोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचा गौरव करण्यासाठी एक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या सत्कार समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भानुदास आरोटे यांचा खारीक-खोबऱ्याची माळ, शाल, श्रीफळ, घड्याळ, पुष्पगुच्छ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला ब्राम्हणवाडा गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विशेष उपस्थिती होती –
दैनिक समर्थ गांवकरीचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर,
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले तालुका संपर्कप्रमुख संजय भाऊ गायकर,
माजी सरपंच भारत आरोटे सर,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आरोटे,
डॉ. प्रदीप कुमकर, डॉ. काशिनाथ कडाळी,
निलेश गवांदे, सुदाम शिंदे, बबन संतु आरोटे आणि पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ.
या सत्कार सोहळ्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, चेअरमन भानुदास आरोटे यांना पुढील कार्यासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

