पुण्य वार्ता
अकोले ( प्रतिनिधी)
अकोले तालुक्यातील शैक्षणिक वैभवात भर घालणाऱ्या आनंदगड शैक्षणिक संकुलाच्या स्थापनेपासून तर प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर विविध जडणघडणीचा साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले असून हे संकुल सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवण्याचे काम करत असल्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन माजी आमदार वैभवराव पिचड केले. वीरगाव येथील आनंदगड पॉलिटेक्निक कॉलेज च्या प्रथम वर्ष शुभारंभ व विद्यार्थी स्वागत समारंभात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आंतरभारतीचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ अनिल रहाणे, संचालिका सुप्रिया वाकचौरे, गीता रहाणे, प्राचार्य मिलिंद सुर्वे, समन्वयक प्रा विद्याचंद्र सातपुते, प्राचार्या पल्लवी फलके, प्राचार्य किरण चौधरी,विभागप्रमुख अक्षय रहाणे, कॅम्पस डायरेक्टर शिवराज वाकचौरे , सुनील वाकचौरे, संजय थोरात, विजय वाघ ,अनिल डोळस,महेश वैद्य, राजेंद्र मालुंजकर , सीमा आंबरे, अलका आहेर, दिव्या वाकचौरे, दिनेश वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री पिचड म्हणाले की, अकोले तालुक्यातील आदिवासी गोरगरीब जनतेची शैक्षणिक भूक भागविण्याचे काम आनंदगड शैक्षणिक संकुल करत आहे व या सर्व गोष्टींचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले .रावसाहेब वाकचौरे व अनिल रहाणे या दोन धेयवेड्या माणसानी आनंदगडच्या माळरानावर नंदनवन उभे केले आहे.प्रतिकूल परिस्थितीत अनेक अडचणींवर मात करत इंग्रजी माध्यम शाळा, फार्मसी कॉलेज, अक्युपंक्चर कॉलेज व आता पॉलिटेक्निक कॉलेज च्या माध्यमातून तालुक्याचे नाव राज्यभरात उज्ज्वल केले आहे. संकुलाचा निकाल देखील उल्लेखनीय असून बाहेर पडणारे विद्यार्थी नोकरी व्यवसायात स्थिर आहेत. पॉलिटेक्निक मधील शाखांची निवड देखील विद्यार्थ्यांची गरज ओळखून केल्याचे सांगत प्रवेशित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल अशी ग्वाही दिली. यावेळी डॉ पल्लवी फलके, सुनिल वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्तविक डॉ अनिल रहाणे यांनी, सूत्रसंचालन कॅम्पस डायरेक्टर प्रा संदीप थोरात यांनी तर आभार झरेज बागवान यांनी मानले. यावेळी उपस्थित सर्व पालक व विद्यार्थी यांचे पुष्पगुच्छ व वही पेन देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा आकाश डोखे, उमेश पटेकर, पूजा शेळके, अनिता पथवे, श्रुती जाधव, सुधीर गांडोळे, राहुल तोरमल सुनील मेंगाळ,दत्ता दातीर ,मातोश्री राधा फार्मसी कॉलेज चे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


