पुन्य वार्ता
पिंपरी, पुणे (प्रतिनिधी) — “गुंतवणूकदार संवाद व आर्थिक साक्षरता अभियान” या उद्दीष्टाने प्रेरित, Heera Wealth या आर्थिक सेवा संस्थेने पुण्यातील Hotel Spree Shivai, पिंपरी येथे एक प्रभावी व प्रेरणादायी कार्यक्रम नुकताच पार पाडला. या कार्यक्रमाला अकोले-संगमनेर परिसरातून पुण्यात स्थायिक झालेल्या नागरिकांचा विशेष प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे आयोजन Heera Wealth चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अक्षय नेहे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या उपक्रमाद्वारे सामान्य गुंतवणूकदार, नोकरी पेशातील व्यक्ती, उद्योजक आणि गृहिणींसाठी गुंतवणूक, विमा, कर नियोजन आणि आर्थिक नियोजन यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे अभिजित नाईकवाडी यांनी विकसित केलेल्या हीरा वेल्थच्या अधिकृत वेबसाईटचे भव्य लोकार्पण करण्यात आले. या नव्या वेबसाईटद्वारे गुंतवणूकदारांना ऑनलाईन सेवा, पोर्टफोलिओ ट्रॅकिंग, नवीन योजना व माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, वित्तीय क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. नीतल सर (Wealth Creation – Mutual Funds), इम्रान सर (Insurance Planning), सीए विकास वैद्य (Tax Planning), आणि शुभम गोपाळे सर (शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपरी) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावर उपस्थित होते. त्यांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव, संधी आणि जागरूकतेबाबत सखोल माहिती दिली.
या वेळी बोलताना अक्षय नेहे यांनी सांगितले की, “आजच्या आर्थिक जगात माहितीच्या अभावामुळे अनेक गुंतवणूकदार चुकीचे निर्णय घेतात. म्हणूनच आर्थिक साक्षरतेसारखा उपक्रम काळाची गरज आहे. Heera Wealth तर्फे आम्ही ग्राहकांना फक्त सेवा देत नाही, तर त्यांच्या आर्थिक प्रवासात खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरतो. गुंतवणूक आणि विमा या दोन्ही क्षेत्रात उत्कृष्ट आणि विश्वासार्ह सेवा देण्याचे आमचे वचन आहे.”
Heera Wealth ही AMFI (Association of Mutual Funds in India) मान्यताप्राप्त म्युच्युअल फंड सेवा संस्था असून, IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) प्रमाणित विमा सल्लागार सेवाही देते. संस्थेचे नेतृत्व करणारे अक्षय नेहे हे Chartered Financial Goal Planner असून त्यांनी फर्ग्युसन कॉलेज व पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ते सामाजिक कार्यातही सक्रिय असून Swami Seva Sanstha (NGO) चे अध्यक्ष म्हणून वृक्षारोपण, शिक्षण व अनाथ मुलांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत.
कार्यक्रमानंतर सर्व सहभागींसाठी स्वादिष्ट आणि दर्जेदार स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. हे संपूर्ण आयोजन पूर्णपणे विनामूल्य होते, जे Heera Wealth तर्फे प्रायोजित करण्यात आले होते.
सूत्रसंचालनाचे जबाबदारी मेधज वाकचौरे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. कार्यक्रमाची शिस्तबद्ध रचना, वक्त्यांची तयारी, आणि सहभागींचा उस्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण सत्र अत्यंत यशस्वी ठरले.
कार्यक्रमानंतर अनेकांनी अशा प्रकारच्या उपक्रमांची वारंवार गरज असल्याचे मत व्यक्त केले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे आयोजन, माहितीचे सादरीकरण, आणि Heera Wealth च्या सेवांची विशेष प्रशंसा केली.
Heera Wealth कडून लवकरच अशाच आणखी आर्थिक साक्षरतेसाठी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
📍 ठिकाण: Hotel Spree Shivai, पिंपरी, पुणे
🍽️ सत्रानंतर: सर्व सहभागींसाठी स्नेहभोजन
💼 आयोजन: Heera Wealth (Founder & CEO – Akshay Nehe)


