पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी) प्रेमानंदजी रुपवते तथा बाबुजी हे वडिलांनी दाखवून दिलेल्या महापुरुषांच्या विचार धारेवरील चालणारे निष्ठावंत निस्वार्थी पारदर्शक कृतिशील सुस्वभावी व्यक्तिमत्त्व होते असे मत अकोले महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. प्रकाश जगताप यांनी व्यक्त केली.
अकोले तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे भुषण बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त कालकथीत अँड प्रेमानंदजी रुपवते तथा बाबुजी यांचा ७ वा स्मृतिदिन निमित्ताने अकोले येथील मार्गदाता विद्यार्थी वसतिगृह येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्ष पदावरून प्रा. जगताप बोलत होते. यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशराव देठे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संघटक रमेशराव शिरकांडे, आरिफ तांबोळी, बाळासाहेब वैराट, वंचित बहुजन आघाडीचे गौतम देठे, उंचखडकचे पोलीस पाटील बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
प्रा. प्रकाश जगताप पुढे म्हणाले की, बाबूजी राजकारणात पुढे गेले असते पण त्यांनी आपले वडिल दादासाहेब रुपवते यांचे काँग्रेस चे विचार सोडले नाही. पक्ष बदलला असता तर नक्की पद मिळाले असते परंतु ते निष्ठावंत होते.
यावेळी कळसचे सरपंच राजेंद्र गवांदे, भाजपा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, प्रा. स्वपान साळवे, अकोलेच्या माजी सरपंच सौ. सुमनताई जाधव यांची भाषणे झाली.
यावेळी कालकथीत अँड प्रेमानंदजी रुपवते यांच्या प्रतिमेचे पुष्पमाला अर्पण करत मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलीत पूजन करण्यात आले व बौध्दाचार्य राजु बबन देठे यांनी त्रिशरण, पंचशील ग्रहण करत विधी संपन्न केला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अगस्ती विद्यालयाचे माजी शिक्षक लक्ष्मण आव्हाड सर, यांनी तर सूत्रसंचलन कवी अशोकराव शिंदे शेवटी आभार वस्तीगृहाचे अधिक्षक गोरक्षनाथ खरात यांनी मानले.
कोट :- कळस चे सरपंच राजेंद्र गवांदे यांनी बाबुजी यांचा काँग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी न देऊन राजकारणात घात केला असा आरोप केला तर भाजपा नेते भाऊसाहेब वाकचौरे यांनी बाबूजी शिवसेनेत गेले असते तर ते खासदार झाले असते अन मंत्री पण झाले असते असे मत व्यक्त केले.

