पुण्य वार्ता
पिंपळनेर [ दैनिक पारनेर समर्थ वृत्तसेवा ] – लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांनी आपल्या पत्रकारितेच्या लेखनीव्दारे लेखन करून समाजातील अन्याय , अत्याचार विरुद्ध सत्य लेखन करून दुर्लक्षित प्रश्नांना प्रकाशित आणून वाचा फोडण्याचे काम करावे , असे स्पष्ट प्रतिपादन पिंपळनेरकर सामाजिक प्रतिष्ठान चे सचिव तुळशिराम कळसकर सर यांनी केले आहे .
राज्यात सामाजिक , शैक्षणिक , कृषी , आर्थिक क्षेत्रात कार्यरत व अग्रेसर असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळनेर पिंपळनेरकर सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने नुकतेच पिंपळनेर येथे दि १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पत्रकारिता , शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीं चा सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ देऊन करण्यात आला . यावेळी पत्रकारिता क्षेत्रात आपल्या पत्रकारितेच्या लेखनी व्दारे समाजातील दुर्लक्षितील प्रश्नांवर सातत्याने लेखन करून त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पारनेर तालुक्यातील महिला पत्रकार , दैनिक पारनेर समर्थ च्या कार्यकारी संपादक , राज्य दैनिक बाळकडू च्या पारनेर तालुका प्रतिनिधी व एस ९ टिव्ही , मिडिया , चॅनलच्या पारनेर तालुका प्रतिनिधी सौ . निलम खोसे पाटील आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्या नगर जिल्हा सचिव , दैनिक पारनेर समर्थ चे संस्थापक , संपादक , दैनिक लोक आवाज चे पारनेर तालुका प्रतिनिधी सुरेश खोसे पाटील हे दाम्पत्य करत असल्याने त्यांना उत्कृष्ठ पत्रकार म्हणून सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ देऊन गौरविण्यात आले .
यावेळी सचिव कळसकर सर पुढे म्हणाले की , खोसे पाटील दाम्पत्य यांनी समाजातील विविध सामाजिक , शैक्षणिक , कृषी , राजकीय , धार्मिक , आर्थिक , या व इतर विषयांवरील समस्या , प्रश्नांवर उल्लेखनीय व अभ्यास पूर्ण लेखन करून पत्रकारिता क्षेत्राचा नावलौकिक उंचावला , अश्या या खोसे पाटील दाम्पत्याचा पुरस्कार प्रदान करून गौरव करणे , समाजाचे आदय कर्तव्यच आहे , असे ही गौरव पुर्ण उद्गार काढून सचिव तुळशिराम कळसकर सर यांनी काढून खोसे पाटील दाम्पत्याचा पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव पूर्ण उल्लेख केला .
या सन्मानाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्या नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील म्हणाले की , राज्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या पिंपळनेरकर सामाजिक प्रतिष्ठान आम्हा दाम्पत्याचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल जो गौरव पूर्ण उल्लेख करून आम्हांला उत्कृष्ट पत्रकार म्हणून जो पुरस्कार सम्मान पुर्वक प्रदान केला , त्याबद्दल प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी , ग्रामस्थ यांचे शतशः ऋणी तर आहोतच , पण या पुरस्काराने आमचीही जबाबदारी निश्चित वाढली आहे व आम्ही आमचा हा पत्रकारितेचा वसा असाच अखंड सुरू ठेवू , अशी ग्वाही ही पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांनी या प्रसंगी दिली . यावेळी पिंपळनेर मधील १० वी च्या परीक्षेत गुणवंत झालेले प्रज्ञा संजय रासकर , धनश्री ज्ञानदेव खामकर , श्रद्धा संतोष रासकर , गौरी राजेंद्र रासकर , आदित्य दत्तात्रय रासकर यांचा व सेवानिवृत्त सुभेदार संजय भाऊसाहेब गाजरे व इतरांचा ही सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक तुकाराम वाखारे हे होते , तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर चे सरपंच देवेंद्र लटांबळे , उपसरपंच छाया कळसकर , पिंपळनेरकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र गाजरे सर ,माजी सरपंच सुभाष गाजरे पाटील , भाऊसाहेब लटांबळे , सेवा संस्थेचे चेअरमन विकास रासकर, संपतराव सावंत , सुरेश होले , प्रसिद्ध व्यापारी विजय गुगळे , राजू रासकर , मेजर संभाजी रासकर , चांगदेव शिर्के सर , वामन हजारे , प्रशांत लटांबळे , प्रा सुरेश रासकर , सागर रासकर , बापूसाहेब लटांबळे , सुभेदार संजय सालके , सौ निर्मलाताई लटांबळे , विद्यालयाचे मुख्याध्यापक रामराव पवार , जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंडलीक , सर्व शिक्षक , ग्रामस्थ , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ मंडलीक यांनी केले , तर सुत्रसंचालन विरेंद्र पवार सर , सचिव तुळशिराम कळसकर सर यांनी सुत्रबद्ध पद्धतीने केल्याने कार्यक्रम बहारदार झाला , शेवटी सौ संगिता पवार व सौ . पठारे या शिक्षिकांनी गोड असे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली .
