पुण्य वार्ता
पुणे, दि. २७ जुलै:
दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने सिद्धार्थजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ‘दैनिक समर्थ गांवकरी’ या वर्तमानपत्राचा सिद्धार्थ भोकरे यांच्या वाढदिवसाचा विशेष अंक प्रकाशित करण्यात आला असून, याचे प्रकाशन काल पुणे येथे सिद्धार्थजी भोकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, दैनिक समर्थ गांवकरी चे कार्यकारी संपादक नवनाथ जाधव, तसेच महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर हे मान्यवर उपस्थित होते.
या विशेष अंकामध्ये सिद्धार्थ भोकरे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबरोबरच, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्याचा देखील विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. युवकांना प्रेरणा देणारे त्यांचे कार्य आणि निर्भीड पत्रकारितेतील त्यांची भूमिका याची यामध्ये प्रभावी मांडणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी सिद्धार्थ भोकरे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दैनिक गांवकरी समूहाने प्रकाशित केलेला हा विशेष अंक वाचकांसाठी एक प्रेरणादायी अंक ठरतोय.



