पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी):-
पेसा कायद्याच्या निर्मितीला 28 वर्षे पूर्ण झाल्याने ग्रामपंचायत चंदगीरवाडी येथे पेसा कायदा जनजागृती कार्यक्रम पेसा 5% अबंध निधीतून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी तालुका पेसा व्यवस्थापक श्री बन्या बापू सहाणे ग्रामपंचायत सरपंच श्री यशवंत बेंडकोळी उपसरपंच जिजा भांगरे ग्रा पं अधिकारी श्रीम देशमुख व तळपाडे मॅडम ग्रामपंचायत कर्मचारी राजू भांगरे व दत्तू इदे ग्रा रोजगार सेवक श्री प्रकाश मुरकुटेबचत गट सीआर पी लीला इदे संगीता इदे व नामदेव भांगरे महिला सदस्य तसेच बचत गटातील महिलांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात मा बिरसा मुंडा राघोजी भांगरे व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला हार घालून दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रास्ताविक ग्रामविकास अधीकारी श्रीमती देशमुख मॅडम यांनी केले तसेच पेसा कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी साठी ग्रामसभेचे बळकटीकरण करणे, शंभर टक्के उपस्थिती बैठका ग्रामस्थांच्या माध्यमातून विकासाचे नियोजन करणे पैसा कायद्याच्या तरतुदींची योग्य प्रकारे अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा विकास करणे. ई बाबतचे योग्य मार्गदर्शन तालुका समन्वयक श्री बन्या बापू सहाणे यांनी केले या नंतर महिलांनी आदिवासी ओव्या व गाणी यांच्या माध्यमातून आदिवासी रूढी व परंपरा जतन करण्यासाठी प्रबोधन केले .अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला व कार्यक्रमात पेसा कायदा अंमलबजावणी बाबत पुस्तिका व नास्ता वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार सरपंच यशवंत बेंडकुळे यांनी मानले.

