पुन्य वार्ता
गणोरे – प्रतिनिधी
जगन्नाथ आहेर
विद्यार्थ्यांना चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. आपल्या देशात आज पॅलेस्टाईनचे झेंडे मिळवत आहे. जो पाकिस्तान आज भिखे – क॔गाल झाला आहे. त्याच्या नावाने भारतात झिंदाबाद च्या घोषणा दिल्या जात आहे.ही शर्मेची गोष्ट आहे. आपल्या समोर यापुढेह अधिक भयानक काळ येऊ पाहत आहे यासाठी आपल्या मुलांवर देशभक्ती व मातृभक्तीचे संस्कार करणे महत्त्वाचे असल्याचे मत पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष तथा सोपानराव देशमुख यांनी व्यक्त केले.
गणोरे (ता.अकोले) येथील रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालयात पद्मभुषण डाॅ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बॅकेंचे संचालक अमित भांगरे, सुरेश गडाख, पोलिस निरीक्षक मोहनराव बोरसे,गटविकास अधिकारी विकास चौरे, जनरल बाॅडी सदस्य मनोज कवडे, मुख्याध्यापक एस के कऱ्हाळे, स्कुल कमिटीचे जेष्ठ सदस्य नामदेव आंबरे,भाऊसाहेब दातीर, तायराम आंबरे, अंबादास दातीर, सोसायटीचे अध्यक्ष अशोक आहेर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे, परसराम उगले, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उज्वला आहेर, सोनाली आंबरे, डाॅ.स्नेहल वाकचौरे, वंदना गोसावी, आंबरे पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबरे, सोमनाथ आहेर आदी उपस्थित होते.
सुरवातीला पद्मभुषण डाॅ कर्मवीर भाऊराव पाटीलांच्या प्रतिमेला मान्यंवराच्या हस्ते पुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. पद्मभुषण भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची गावातुन सवाद्य मिरवणु काढण्यात आले.मिरवणुकीत टिपरी आदिवासी नृत्य लक्षवेदी ठरले. मुख्याध्यापक कऱ्हाळे एस के यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले
सर्वांची वाचनाची सवयच कमी झाली आहे. विद्यार्थ्याबरोबर शिक्षकांचे देखील अवांतर वाचन कमी असल्याचा खेद त्यांनी यावेळी व्यक्त केला. वाचन हे एक वेड आहे. वाचनाने माणसाची प्रगती होत असते. शाळेत विद्यार्थ्यांना देशभक्ती मातृभक्तीचे संस्कार होणे महत्त्वाचे आहे. आज देशात पॅलेस्टाईनचे झेंडे मिरवले जात आहे. भारतात भिखे कंगाल झालेल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहे. येणारा काळ भयानक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.आजची युवा पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. शिक्षक वर्गात सांगतात व्यसन करणं वाईट आहे. आणि शाळेसमोरच दुकानावर पाटी असते “भिकुसा बिडी मर्दानी से भारी” विद्यार्थ्यांनी शिक्षकाचे ऐकायचे की जाहिरातीचे असा प्रश्न पडतो.अनुदान नसलेल्या शाळे मधील शिक्षक शिकवता शिकवता बिगर अनुदानित शाळा वरच सेवानिवृत्त होत आहे. अनुदान मिळत नसलेल्या शाळेतील शिक्षकाची मोठी पिळवणुक होत आहे.आज विद्यार्थ्यांना खुपच जास्त मार्क्स पडत आहे.परंतु या वाढत्या मार्काबरोबर विद्यार्थ्यांमध्ये ज्या प्रमाणात समज यायला पाहीजे त्याप्रमाणत आल्याचे दिसत नाही हे दुर्दैव्य आहे. हसत खेळत शिक्षण हे कसलं धोरण. या सारख्या चुकीच्या कल्पना शिक्षणात आल्याने शिक्षण क्षेत्राची मोठी घसरण झाली आहे.
समाजात आजश दुषीत वातावरण होत आहे. नको ती माणसं समोर येत आहे.त्या माणसांचे आपण कौतुक करत आहे.चुकीच्या माणसांचे कौतुक होत असल्याचा संदेश समाजात जातो आहे.आम्ही भाऊराव पाटलांच्या ध्येयाला,त्यांनी केलेल्या त्यागाला विसरलो असल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली.
गटविकास अधिकारी आपल्या भाषणात म्हणाले ___
कोट
● आज सहा तास अभ्यास केला तर उद्या बारा तास काम करण्याची गरज पडणार नाही.
● आपल्या आई-वडिलांनी दिलेले सल्ले तुम्हाला पटत नसतील तर उद्या लोकांचे टोमणे खायला तयार राहा.
● आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच प्रयत्न करा नाहीतर तुम्हाला दहा-बारा हजारात ठेकेदारी काम करुन उद्या दुसऱ्याची स्वप्ने पूर्ण करावी लागतील.
● आज आपले आई वडील गरीब असतील परंतु आपण यापुढे गरिब राहणार नाही हे मनोमन ठरवुन घ्या.
● संधी खुप असतात परंतु शिकण्याची संधी याच वयात उपलब्ध होत असते यानंतर ही संधी मिळणार नाही. खुप शिका.
या पाच गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवण्याचे आवाहन गटविकास अधिकारी विकास चौरे यांनी केले.
यावेळी संत नामदेव आंबरे अमित भांगरे, सुरेश गडाख,पी एस आय मोहनराव बोरसे यांनी मनोगत व्यक्त केली.
वाकचौरे एस डी व वायळ एल बी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. शेवटी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक भांगरे आर डी यांनी उपस्थिताचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
—————

१ ) गणोरे’ – येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात पद्मभुषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एस झेड देशमुख सर.
२ ) गणोरे – येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात डाॅ कर्मवीरभाऊराव पाटीलयांच्या जयंतीनिमित्त मान्यवराच्या हस्ते प्रतिमा पुजन करताना.

