पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अंबिकानगर शाळेत परसबाग विकसित होत आहे
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत प्रत्येक शाळेत विविध भाजीपाला युक्त परसबाग या उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर लहीत खुर्द या शाळेमध्ये अकोले पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री अभयकुमार वाव्हळ साहेब यांच्या प्रेरणेने तसेच पोषक शक्ती निर्माण योजनेचे अकोले तालुका अधिक्षक श्री अरविंद कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिंगदेव बीटाचे विस्तार अधिकारी श्री सिताराम धांडे साहेब व लहित खुर्द केंद्र प्रमुख श्री वाल्मिक बडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शाळेची उपलब्ध जागा लक्षात घेऊन शालेय परिसरात कोशिंबीर,वांगी, टोमॅटो ,वालवड, मिर्ची, घेवडा,पुलावर कोबी या भाजीपाल्याची लागवड विद्यार्थीचा सहभाग घेऊन लावण्यात आली .
शाळेत परसबाग उभी राहण्यासाठी शाळेचे संस्थापक श्री अंकुशराव गोडसे तसेच शाळेच्या स्वयंपाकी सौ.मंगळताई गोडसे यांनी भरघोस मदत आणि श्रमदान केले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शेतात पिकांची कशी लागवड केली जाते यांची माहिती जाणून घेतली व प्रत्यक्षात सहभाग नोंदविला.या उपक्रमासाठी शाळेतील पालक श्री योगेश गोडसे, श्री प्रविण मिंढे, श्री योगेश जाधव, श्री विनोद शिंदे यांनी विशेष परिश्रम आणि सहकार्य केले आणि पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.


