पुन्य वार्ता
गणोरे प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा, द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय नेट बॉल क्रीडा स्पर्धा 2024 25 स्पर्धेमध्ये गणोरे तालुका अकोले येथील प्राथमिक शिक्षक सौ.अर्चना व उमेश रामनाथ काळे यांचा मुलगा कु. स्वरूप उमेश काळे यांने चमकदार कामगिरी करत गणोरे गावाचे नाव राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत चमकवल्याने स्वरूपचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
भंडारा येथील झालेल्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत पुणे विभागातर्फे 17 वर्षे वयोगटाच्या आतील नेट बॉल संघात स्वरूप उमेश काळे यांने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्वरूपच्या या अभिमानास्पद यशाबद्दल स्वरूपचे व स्वरूप ला मार्गदर्शन करणारे शिक्षक, व स्वरूपचे आई-वडील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे यांचा भाचा असून माजी पोलीस उपनिरीक्षक श्री रामनाथ काळे यांचा नातू तसेच महाराष्ट्र पोलीस दलात असणारे संतोष काळे यांचा पुतण्या असून स्वरूपचे या यशाबद्दल त्यांनी व अकोले चे आमदार डॉ.किरणजी लहामटे,मा. सरपंच के.बी.आंबरे, ग्रा. सदस्य विवेक आंबरे, ग्रा. सदस्य पोपट आहेर, सोसायटीचे चेअरमन भगवान खतोडे, वसुंधरा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष भाऊ पाटील आंबरे, राजेंद्र वालझाडे, भास्कर शेठ शिंदे, रमेश दादा दातीर,ज्येष्ठ नेते अशोकराव आहेर, स्वाभिमानीचे संतोष उगले टेलर,सोमनाथ आहेर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील पुंडे,मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक उगले,पत्रकार जगन्नाथ आहेर, किसन आप्पा आंबरे, आरोटे व काळे परिवार,सर्व मित्र परिवार, संगमनेर अकोले सर्व प्राथमिक शिक्षक, सर्व संस्थांचे पदाधिकारी,गणोरे ग्रामस्थ आदींनी स्वरूपचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


