पुण्य वार्ता
प्रतिनिधी (श्री दत्तू जाधव) मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने आयोजित ,राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन 2024. राज्यस्तरीय कृषिरत्न गुणिजन गौरव पुरस्कार आंबड गावचे सुपुत्र राजू भाऊसाहेब कानवडे यांना मुंबई येथे दिनांक १७ डिसेंबर रोजी श्री नंदू सावंत सुप्रसिद्ध साहित्यिक यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला ते २००७ पासून यशस्वी मधमाशी पालन उद्योग करत आहे त्यातून मध ,मेण , पराग, मधमाशी रोगण, तसेच मेणा पासून बायप्रॉडक्ट, मधापासून बायप्रॉडक्ट तयार करून KbF honey कानवडे बी फार्म हनी या ब्रांड ने विक्री करत आहे. हजारो मधमाशी वसाहत उत्पादन करून शेती पिके, फळे झाडे, बियाणे उत्पादने, करताना मधमाशीच्या माध्यमातून होणारे परगिभवनाचे महत्व शेतकऱ्यांनापटवून देऊन शेतकऱ्यांना परागीभवनासाठी मधपेटी विकत व भाडेतत्त्वावर पुरवठा करून हजारो एकर क्षेत्राचे परागिभवन होते त्यातून शेती उत्पादनात भरीव वाढ होते हे सहप्रयोग शेतकऱ्यांना पटवून दिले. या व्यवसायातून 15 ते 20 तरुणांना रोजगार निर्मान झाला त्याच बरोबर शेतकरी व नवीन तरुणांना रोजगार निर्माण होण्यासाठी मधमाशी पालन प्रशिक्षण व मार्गदर्शन करतात या कार्याची दखल घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच, खादी ग्रामोद्योग मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देखील प्रथम क्रमांक मधुमित्र 2024 पुरस्कार त्यांना या वर्षी प्रदान करण्यात आला
