पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
केवळ दलित आणि मागासवर्गीय समाजापुरते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मर्यादित – सीमित करु नये,त्यांनी कष्टकरी, कामगार,वंचित सर्व जाती धर्माला न्याय देण्याचे काम केले असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची व्याप्ती विश्वाला दिशा देणारी आहे असे प्रतिपादन अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे स्वीकृत विश्वस्त आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक मधुकरराव सोनवणे यांनी
केले
अगस्ती महाविद्यालयात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व्याख्यान प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी अकोले एज्युकेशन
सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त, माजी आमदार वैभवराव पिचड होते.याप्रसंगी संस्थेचे कायम विश्वस्त कॉ. गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकर देशमुख, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, शिक्षणाधिकारी संपत मालुंजकर, प्रबंधक सीताराम बगाड यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. सोनवणे पुढे
म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषविलेल्या मंत्रीपदावरील कार्यकाल संस्मरणीय अन् दखलपात्र ठरला. तसेच कायदे विषयक क्षेत्रातील
त्यांचे योगदान देशाला कायम स्वरूपी दिशादर्शक ठरले, हिंदू कोडबील, स्त्री वर्गाच्या हिताचे आणि संरक्षणा-
संदर्भातील केलेले काम तसेच कामगार कायदे आणि समान दर्जा भारतातील लोकशाही पद्धती अन् मतदान हक्क प्रक्रिया याबाबतीत डॉ.बाबासाहेबांचे धोरणात्मक कार्य दिशादर्शक ठरले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार Uवैभवराव पिचड यांनी डॉ. बाबासाहेबांची राजकीय , सामाजिक, आर्थिक व विशेष करून न्याय प्रक्रिया तसेच एकूणच राष्ट्रीय जडणघडणीतील वैचारिक अन् कृतीशील योगदान हे भारतीयांसाठी कधीही न विसरणारे आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी कायम विश्वस्त गिरजाजी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा.डॉ.नितीन आरोटे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.अशोक दातीर यांनी मानले.
चौकट- यावेळी प्रा.विजय शेंडगे आणि सुदेश काठाळे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्ताने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.शेंडगे व काठाळे यांनी आपल्या सेवा कालावधीतील आठवणींना उजाळा दिला व संस्थेने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
