पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-१ जानेवारी २००४ मध्ये २० महिलांनी एकत्र येउन समृध्दी स्वयंसहाय्यता महिला बचत गट सौ. सुवर्णा सहाणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला. पहिली पाच वर्षे मासिक १०० रुपये त्यानंतर मासिक २००/- पुढे मासिक ३००/- रुपये या प्रमाणे बचत केली. व आता महिना ५०० रुपये या प्रमाणे बचत सुरु आहे. गेल्या वीस वर्षामध्ये १३ कोटी २० लाख रुपयांची उलाढाल केली आहे. शेळीपालन, शिलाई मशिन, घर बांधणी, मुलांची लग्न, शेती विकास, हॉटेल व्यवसाय, आदि. कारणांसाठी कर्जाचे वाटप केले असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करुन स्वावलंबी बनविले आहे. फक्त एकदा जिल्हा बँकेचे कर्ज घेऊन ते नियमित भरले. सभासदांना १ लाखापासून ५ लाखा पर्यंत कर्ज वाटप केले जाते. सचिव श्रीमती शांताबाई फापाळे या सतत मदत करत असतात.
आज पर्यंत प्रत्येक सभासदाला व्याजापोटी १ लाख २ हाजार इतकी रक्कम वाटली आहे. या दिवाळीला प्रत्येक सभासदाला ५० हजार रुपये रोख देऊन दिवाळी ही आनंददाची व गोड केली आहे. अशी माहीती अध्यक्ष सौ. सुवर्णा सहाणे यांनी दिली.
सभसदांनी दिपावली निमित्त अध्यक्ष सौ. सहाणे यांना कागदपत्रे ठेवण्यासाठी एक लोखंडी कपाट भेट दिले आहे.


