पुन्य वार्ता
पुणे – शासन सहकार कायदा १९६० नुसार स्थापन झालेल्या सहकारी संस्था ६४ वर्ष जुन्या कायद्यामधील तरतुदीप्रमाणे चालत असल्यामुळे व्यवसाय करत असताना अनेक मर्यादा येतात, त्यामुळे सहकारी वित्तीय संस्थांवर मध्ये लोकांनी गुंतवणुक केल्यानंतर मर्यादित व्याजदर मिळतो, कारण अशा संस्थांना पारंपारिक पद्धतीने ठेवी जमा करणे व कर्ज वाटप करणे , यामध्ये साधारण शेकडा २ ते ५ टक्के च्या दुराव्यावरती संस्थांना व्यवसाय करावा लागतो, आजच्या महागाईच्या काळामध्ये एवढ्या कमी वार्षिक फायद्यामध्ये संस्थांना टिकणे व चालवणे अवघड होत चालले आहे, ६४ वर्षानंतर उत्पन्नाचे स्रोत बदलले असून संचालक मंडळांनी आजच्या काळातील तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेगवेगळ्या उत्पन्नाच्या स्रोतावर काम करून संस्थेला उत्पन्नाचे साधन वाढवले तर चांगले उत्पन्न मिळवून मोठ्या प्रमाणावर फायदा कमावता येईल , असे प्रतिपादन विकास बेंगडे पाटील यांनी केले.
केंद्र सरकारने २००२ ला मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज अॅक्ट बनवला , त्यानुसार आपली संस्था महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये कार्यरत असून आज १८ शाखा कार्यरत आहेत . चालू आर्थिक वर्षात घटनेच्या पोटनिमांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय सहकार विभागाच्या कडे आपण विनंती केलेली असून आपल्या पोटनियम दुरुस्ती झाल्यानंतर महागणपती मल्टीस्टेट बांधकाम , जमीन खरेदी विक्री , संगणक , कृषी ,आरोग्य , शिक्षण व व्यापार क्षेत्र यासारख्या चांगला फायदा कमवून देणाऱ्या व्यवसायांमध्ये गुंतवणूकदार भागीदार म्हणून सहभागी होणार असून साधारण तीन वर्षांमध्ये शेकडा १०० टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळविणे व ठेवीदार सभासदांना चांगला व्याजदर मिळवून देणे, त्याचबरोबर संस्थेतील कर्मचारी वर्गाला खाजगी क्षेत्रातील बँका प्रमाणे चांगले पगार देणे व या कर्मचाऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे , ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना चांगले घर , मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी नामांकित शिक्षण संस्था , आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करता यावी , यासाठी चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर सर्व सभासद लोकांना आपले जीवनमान उंचावण्यासाठी संस्थेमार्फत चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, व्यवसाय करण्यास इच्छुक असणारे सभासद भांडवलामुळे जर त्यांचा व्यवसाय थांबत असेल , तर त्यांच्या व्यवसायात गुंतवणूकदार भागीदार म्हणून संस्था सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी मजबूत उभी राहील , अशी ठाम भूमिका ही चेअरमन विकास बेंगडे पाटील यांनी केले, यावर्षी आपण शेकडा १५ टक्के लाभांश दिला असून पुढील आर्थिक वर्षापासून शेकडा १८ टक्के लाभांश देण्यासाठीची पोटनियम दुरुस्ती करून घेण्यासाठी विनंती केली आहे. काटकसर करून संस्था चालवण्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून संस्था चालवण्याचा माणूस ठेवून आपले संचालक मंडळ काम करत आहे, की ज्यामुळे ठेवीदारांना चांगला परतावा देता येईल, त्याच बरोबर भागधारकांना चांगला लाभांश आणि सुविधा देता येतील, कर्मचाऱ्यांना चांगले वेतन देता येईल, व इतर बहुतेक सुविधा देता येईल असा ठाम विश्वास चेअरमन विकास बेंगडे पाटील यांनी व्यक्त केला. येणाऱ्या ५ वर्षांच्या कालावधीत सहकार क्षेत्रामध्ये ज्या वित्तीय संस्था काम करतात , यांच्यासाठी महागणपती मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था आदर्श म्हणून काम करील आणि संपूर्ण भारत देशामध्ये वित्तीय क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था राहील , असा विश्वास चेअरमन बेंगडे पाटील यांनी यावेळी १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना केला.
१२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध मराठी सिने कलाकार संदीप पाठक , उद्योग नगरी पिंपरी चिंचवड मधील प्रसिद्ध उद्योजक विकास मुंगसे पाटील, उद्योजक योगेश सैद , संस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र हुले , ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव बेंगडे पाटील , पवन हगवणे पाटील , महिला संचालिका सौ . निलम बेंगडे पाटील , सौ . शोभा टिकेकर , गोविंद इंदोरे , राजेंद्र देवके , अनिल गावडे , जालिंदर इंदोरे , निघोज शाखेचे सल्लागार सलीम हवलदार , पांडुरंग बेलोटे , सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर , आसिम भाई , लक्ष्मण लाळगे , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील , संस्था शाखांचे सल्लागार , सभासद , ठेवीदार , कर्जदार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
[ चौकट –
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नगर जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे निघोज शाखेचे सल्लागार सुरेश खोसे पाटील यांचा संस्थेचे चेअरमन विकास बेंगडे पाटील व मराठी चित्रपट सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते संदीप पाठक यांच्या हस्ते व सर्व संचालक , सभासद , सल्लागार , ठेवीदार , कर्जदार आणि कर्मचारी यांच्या उपस्थित शाल , पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . ]
सभेचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समाधान सन्नके यांनी अतिशय नियोजन बद्धतीने केले , तर सुत्रसंचालन व आभार वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी केले .
