अकोले प्रतिनिधी-
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने अ. ज. अकोले विधानसभा मतदार संघासाठी अकोले तालुक्यात नामनिर्देशन पत्र वाटपाची भरण्याची प्रक्रिया काल दिनांक २९/१०/२०२४ रोजी पार पडली असून अकोले तालुक्यात काल दि.२९ पर्यंत एकूण १३ व्यक्तींनी १६ नामनिर्देशन दाखल केले आहे. यामध्ये श्री. पांडुरंग नानासाहेब पथवे, (राष्ट्रीय समाज पक्ष), श्री. किरण यमाजी लहामटे, (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), श्री. गणेश काशिनाथ मधे(अपक्ष),श्री. वैभव मधुकर पिचड, (अपक्ष), श्री. मारुती देवराम मेंगाळ, (अपक्ष), श्री. भिवा रामा घाणे, (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी), श्री. मधुकर शंकर तळपाडे, (अपक्ष), श्री. अमित अशोक भांगरे, (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी ,शरदचंद्र पवार) श्री. विलास धोंडीबा घोडे(अपक्ष), श्री. किसन विष्णू पथवे, (अपक्ष), श्रीमती शकुंतला भाऊसाहेब धराडे,( अपक्ष), श्री. रामदास दत्तू लोटे, (अपक्ष )व श्री. भास्कर किसन भांगरे, (अपक्ष), यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव यांचे कडे नामनिर्देशन पत्र दाखल केलेले होते. आज दि.३०/१०/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून तहसीलदार यांच्या दालनात नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पार पडली असून ज्या ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्या पैकी भारत किसन भांगरे
अपक्ष असल्याने त्यांनी १० सूचक देणे अपेक्षित होते त्यांनी पाचच दिले होते त्यांना नियमानुसार संधी देण्यात आली होती मात्र शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत पूर्तता करू शकले नाही सबब त्यांचा
अपक्ष अर्ज अवैध ठरविण्यात आला असून उर्वरित 12 उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी दिली.
