पुण्य वार्ता
शेवगाव प्रतिनिधी
शेवगांव दि. १/११/२०२४ रोजी आखेगाव रोड येथील सांयकाळी ७.०० वाजता शिवम गार्डन येथे संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. वसंतराव मुंढे यांच्या संकल्पने संघटनेचे प्रदेश सरचिटणीस
डाॅ विश्वासराव आरोटे यांचे हस्ते दिवाळीनिमित्त मिठाई व भेटवस्तू वाटप करण्यात आली. यावेळी केला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असते त्याच अनुषंगाने यावेळी नुकत्याच संपन्न झालेल्या दिक्षाभुमी ते मंत्रालय पत्रकार सवांद यात्रेच्या पुस्तिकेचे प्रकाशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे संपादक असलेल्या समर्थ गावकरी या वृत्तपत्राचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी डॉ विश्वास आरोटे यावेळी बोलताना म्हणाले की, सरकारी व्यवस्था कोणत्याही घटकाला न्याय देताना मतांच्या गाठ्याचा विचार करत असाल
तर पत्रकार हा देखील एक मतांचा गठ्ठा असुन त्याचा मागण्याकडे देखील शासनाने लक्ष द्यायला हवे असल्याचे मत डॉ आरोटे यांनी व्यक्त करत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांच्या अथवा पक्षाच्या भूमिका विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार व वृत्तपत्र ही माध्यमे अत्यंत आवश्यक आहे. वेळ कमी असल्याने पुर्वनियोजीत नसल्याने हा पञकाराबरोबर हा कार्यक्रम सांयकाळी ७.०० वाजता संपन्न झाला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दता गाडगे, जिल्हा सरचिटणीस सुरेश खोसे, शेवगांव तालुका अध्यक्ष रावसाहेब मरकड, दादासाहेब डोंगरे, रविंद्र उगलमुगले, रामनाथ रुईकर, तारामती दिवटे, प्रविण खोमणे, दिपक खोसे, रेवननाथ नजन, सुरेश पाटील, राम सांळूके,आयाज शेख, इ पञकार उपस्थित होते. या महाराष्ट पञकार संघाचे सदस्य सुत्रसंचालन रेवननाथ नजन . तसेच रामनाथ रुईकर यांनी आभार व्यक्त केले.

