पुन्य वार्ता
अकोले
मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेच्या वतीने ह भ प (कै)दिगंबर भास्कर परुळेकर स्मृती पुरस्कार मूळ अकोल्याचे असणारे जेष्ठ साहित्यीक डॉ अनिल सहस्त्रबुद्धे याना जाहीर झाला आहे.संत साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या अभ्यासू साहित्यिकांना हा प्रतिष्ठित पुरस्कार गत ९९ वर्षांपासून दिला जातो.प्रा उषा तांबे,श्री प्रकाश पागे व श्री अशोक बेंडखळे यांच्या निवडसमितीने या वर्षीच्या पुरस्कारासाठी डॉ सहस्त्रबुद्धे यांची निवड केली.
२६ ऑक्टोबर रोजी मुंबई मराठी साहित्य संघाच्या वर्धापनदिनी नामवंत चित्रकार वासुदेव कामात यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
डॉ सहस्त्रबुद्धे यांची आज पर्यंत ८० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत.लोकसाहित्य, संत साहित्य,समीक्षा, साहित्यशास्त्र,संशोधन,तत्वज्ञान, चरित्र,वैचारिक तसेच ललित साहित्याचा त्यांच्या प्रकाशित पुस्तकात समावेश आहे.
डॉ सहस्त्रबुद्धे याना त्यांच्या लिखाणाबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.’ज्ञानेश्वरीतील साहित्य विचार ‘या त्यांच्या ग्रंथास कांची कामकोटी पीठ जगद्गुरू शंकराचार्याकडून ‘विद्वत पुरस्कार’ मिळाला होता.श्रीगोंदे येथील संत शेख महंमद महाराज देवस्थानचा ‘संत सेवा गौरव पुतस्कर’ महर्षी अगस्त्य लोकरत्न पुरस्कार,विक्षेपाटील फौंडेशन चा साहित्य सेवा पुरस्कार,’लोकगंगा’ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार,आदी पुरस्कार मिळाले आहेत.त्यांच्या ‘लोकनिष्ठ अध्यत्मवाद’ या ग्रंथास राज्य शासनाचा ना.गो.नांदापूरकर पुरस्कार मिळालेला आहे.
डॉ सहस्त्रबुद्धे यांच्या साहित्यावर आज पर्यंत सात जणांनी एम.फील. तर एक जणाने पीएच.डी. केली आहे.त्यांच्या साहित्यावर काही संशोधन व समीक्षा ग्रंथ परिसिद्ध झालेले आहेत.


