पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी– राज्याचे जेष्ठ नेते, माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी मुळा परिसरातील कोतुळ येथील श्रद्धास्थान असलेल्या कोतुळेश्वर मंदिरामध्ये पिचड समर्थक कार्यकर्त्यांनी महादेवाला दुग्धभिषेक केला व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना केली. व त्यांच्या डोळ्यादेखत वैभवराव पिचड यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी आशीर्वाद द्यावी अशी विनंती करण्यात आली.
यावेळी माजीमंत्री पिचड यांच्या बरोबर गेल्या 40 वर्षात काम करणारे जेष्ठ नागरिक यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते.
यावेळी माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी गेल्या 40 वर्षात पाणी अडविण्याचे मोठे काम केले असून मुळा,प्रवरा व आढळा परिसर बांधण्याचे काम केले.त्यांनी 40 वर्षे आमच्यासाठी खूप काही केले आता आम्ही त्यांच्या डोळ्यादेखत वैभवराव पिचड यांना आमदार करणारच अशी भावना व्यक्त केली.
तसेच एका कार्यकर्त्याने कांदा विकल्यावर निवडणुकीसाठी 25000/- तर बेलापूर येथील कार्यकर्त्याने 51000/- रुपये देण्याचे काम जाहिर केले. काल अकोले येथे झालेल्या बैठकीत कैलास जाधव यांनी 25000/- जाहीर केली होती.
आजही कोतुळ येथे वैभवराव पिचड यांनी निवडणूक अर्ज भरून त्यांनी पिचड साहेब यांच्या सेवेला जावे आम्ही निवडणूकीचे सर्व काही पाहतो अशी भावना व्यक्त केली .
यावेळी मधुकरराव पिचड यांची जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी विधानसभा निवडणुकीत उतरल्याचे दिसून आले तर आताच्या जर्मल च्या भांड्यांना आम्ही जुनी पितळाची भांडी दाखवून देऊ अशी मार्मिक टीकाही केली.
चौकट- राजूर येथेही दत्त मंदिरात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.व उपस्थित कार्यकर्ते,समर्थक,हितचिंतक हे वैभवराव पिचड यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी यासाठी आग्रही दिसले.
चौकट- आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या रंधा धबधबा येथील घोरपड देवी मंदिरात आदिवासी कार्यकर्त्यांनी होम हवन केले.यावेळी माजीमंत्री पिचड यांच्या आजारपणामुळे एक कार्यकर्ता अतिशय भावुक झाला होता.यावेळी त्याला आपले अश्रू आवरता आले नाही.
कोतुळ, राजूर व रंधा धबधबा येथे
यावेळी मोठ्या संख्येने पिचड समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.

