पुन्य वार्ता
डोंगरगाव प्रतिनिधी
नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यालय मध्ये 23 जानेवारी 2025 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२७ वी व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी शरद उगले हे होते.नेताजी बद्दल विध्यार्थी मनोगत झाले.प्रमुख पाहुण्यांचे मनोगत झाले.या वेळी विध्यार्थी नी परीक्षेत नावीन्यपूर्ण यश संपादन केलेल्या विध्यार्थ्यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव विठ्ठलभाऊ उगले,अध्यक्ष एकनाथ गोर्डे,सरपंच दशरथ उगले,उपसरपंच अमोल उगले माजी सरपंच बाबासाहेब उगले,माजी उपसरपंच अशोकराव उगले,माजी सदस्य आर के उगले,सोसायटी चेअरमन कोंडाजी उगले, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील उगले,नेताजी पतसंस्था चेअरमन अमोल उगले,व्हा चेअरमन सावळेराम गायकवाड,विद्यालयाचे शालेय व्यवस्थापन अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले,सूर्यभान सानप,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अध्यक्ष अमोल उगले, विमल उगले,वैशाली घोडेकर,सोसायटी संचालक चंद्रभान उगले,दत्तात्रय उगले,मेजर संदीप उगले,चंद्रभान कदम,आदी ग्रामस्थ विध्यार्थो उपस्थित होते.
नेताजींच्या जयंतीच्या निमित्ताने संध्याकाळी सात वाजता स्नेहसंमेलन विद्यार्थी विविध गुणदर्शन तसेच पारितोषिक वितरण करण्यात आले.वार्षिक स्नेहसंमेलनाचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विठ्ठलभाऊ उगले हे होते.
प्रमुख पाहुणे जामी साहेब,
देवठाण बीटाचे सुनील जी घुले,ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य, संस्थाचे चेअरमन,व्हा चेअरमन,सदस्य, उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव येथील मुख्याध्यापक सोमनाथ आंबरे, विद्यालयाची माजी विद्यार्थिनी प्राध्यापिका जयश्री उगले उपस्थित होत्या.तसेच जयश्री उगले/एखंडे यांनी विद्यालयाला 5000 रुपयाची देणगी दिली.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 127 वी जयंती व 26 वे स्नेहसंमेलन उत्साहात पार पाडण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता हासे, शिक्षक शशिकांत कातोरे,भास्कर वाळुंज,विजय भालेराव, आर एस सहाने, बि.डी उगले कुऱ्हाडे मॅडम ,कुरकुटे मॅडम, संतोष उगले शांताराम उगले शिवाजी उगले, अपर्णा रेवगडे, खैरनार सर या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन भास्कर वाळुंज यांनी केले.
या वेळी ग्रामस्थ,पालक ,माजी विधार्थी उपस्थित होते.

