पुण्य वार्ता
अकोले(प्रतिनिधी)
शालेय जीवनात विद्यार्थी विज्ञान शिकून भविष्यातील शास्त्रज्ञ बनत असतो विज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते व शाळेत खरेच विद्यार्थी विज्ञान शिकला का याचे अवलोकन झाले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले. आनंदगड शैक्षणिक संकुलात आयोजित 52 व्या विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी आंतरभारतीचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे होते.
व्यासपीठावर अहिल्यानगर माध्यमिक जिल्हा शिक्षण अधिकारी अशोक कडूस शिक्षणाधिकारी योजना बाळासाहेब बुगे, आंतरभारती चे सचिव अनिल रहाणे, अकोले पंचायत समिती गटविकास अधिकारी अमर माने ,उपशिक्षणाधिकारी संजय कुमार सरवदे,गटशिक्षणाधिकारी अभय कुमार वाव्हळ,शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय कवळे,बाळासाहेब दोरगे, अनिल गायकवाड, सविता कचरे,स्वाती अडाणी, बाळासाहेब आरोटे,तालुका वैद्यकीय अधिकारी श्याम कुमार शेटे,जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ शिंदे संजय कुमार निकरड ,धनंजय भांगरे , सतीश काळे, श्याम मालुंजकर , मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील धुमाळ, सुरेश शिंदे, दत्तात्रय आरोटे सरपंच संजय थोरात , सुनील वाकचौरे, किरण चौधरी आदी उपस्थित होते.

प्रदर्शनाचे डिजिटल उद्घाटन करताना रिमोट द्वारे दीप प्रज्वलन शिक्षक श्री. रविंद्र गांगर्डे व श्री पांडुरंग धनवडे यांनी घडवून आणले. कला शिक्षक दिनानाथ खराटे व आनंदगड च्या शिक्षकांनी वैज्ञानिक रांगोळी काढून उपस्थितांचे लक्ष वेधले.
विज्ञान प्रदर्शनातून नवनवीन उपकरणे आणि प्रयोगाद्वारे संशोधक घडत असतात विज्ञानाचा उपयोग व दुरुपयोग शालेय जीवनातच अंगीकारला जावा असेही श्री पाटील पुढे म्हणाले.
पर्यावरणाचे रक्षण करणारा अकोले तालुका असून बाल वैज्ञानिकांमध्ये भावी वैज्ञानिक दडलेले आहेत असे प्रतिपादन जिल्हा शिक्षणअधिकारी बाळासाहेब घुगे यांनी केले.
डिजिटल क्रांतीसाठी शिक्षकांनी आधी वैज्ञानिक बनायला हवे. ग्रामीण भागातील तालुक्यातील मूलभूत गरजा ओळखून जिल्ह्यातील वैज्ञानिक काम करत आहेत आणि प्रदर्शन हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन गट विकास अधिकारी अमर माने यांनी व्यक्त केले.
आपल्या प्रास्ताविकातून जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी प्रदर्शनांची गरज का? हे सांगून वीरगाव सारख्या ग्रामीण भागात अतिशय दर्जेदार असे जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल आनंदगड शिक्षण संकुलाचे कौतुक केले.
अध्यक्षीय मनोगतातून अनिल राहणे यांनी जिल्हास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनासाठी संस्था सर्वतोपरी मदत करून कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणार असल्याची ग्वाही दिली.


उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाभरातून स्पर्धक विद्यार्थी व शिक्षक पालकांचा मोठा प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळाला. या तीन दिवसीय प्रदर्शनासाठी विधान परिषदेचे सभापती ना.प्रा. राम शिंदे . खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके ,आमदार सत्यजित तांबे ,आमदार डॉक्टर किरण लहामटे,आमदार अमोल खताळ ,आमदार रोहित पवार हे मान्यवर भेट देणार आहेत. पारितोषिक वितरण पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे.
यावेळी जिल्हा गणित व विज्ञान संघटनेचे श्री.सचिन वाकचौरे ,विनोद नवले ,अनिल गोडसे,विजय उगले ,विजय भालेराव,मधुकर गुंजाळ, रंगनाथ एखंडे,जगन्नाथ जाधव ,शहाजी मंतोडे दिलीप दातखेडे, कैलास लोटे तात्यासाहेब दौंड ,श्रीमती स्मिता धनवटे श्अर्चना सातपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी तालुक्यातील सर्वच शाळांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा संदीप थोरात यांनी तर आभार गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवराज वाकचौरे,अधीक्षक रवींद्र आंबरे, देविदास चारोडे ,लक्ष्मण कवडे , अंजिरा देशमुख, अलका आहेर, पिंगला तोरमल, नफीसा शेख ,सीमा आंबरे,विवेक शेटे ,पांडुरंग खाडे, शिल्पा देशमुख, सोनाली तनपुरे, स्वप्नाली बाळसराफ, स्वाती नवले, दत्तात्रय जगताप, सुनीता भांगरे, सुजाता भांगरे, उषा गुंजाळ, साईनाथ वैद्य, अस्मिता टाळे,कोमल भालेराव,गोरक्ष पवार, कविता दातीर, उज्ज्वला दातीर, अश्विनी गिरी, सोनाली नळे, पंकज वर्पे, राहुल चिकणे, विशाल सांगळे, रवींद्र चौधरी , रवींद्र वरपे, मोनिका मोरे, प्रज्ञा देशमुख, राधिका देशमुख आदींसह सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

