पुन्य वार्ता
डोंगरगाव प्रतिनिधी
अकोले । तालुक्यातील डोंगरगाव येथील गेणू (लहानू)दादा उगले यांचे (31 जुले 2025) रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, दोन मुले,एक मुलगी, सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.
भाऊसाहेब गेणू उगले व विनायक गेणू उगले यांचे ते वडील होत.
या वेळी डोंगरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी अकोले,संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 सकाळी 8 वा.शैनेश्वर व भोलेश्वर आश्रम डोंगरगाव येथे होईल.
यावेळी ह.भ.प.किशोर महाराज खरात यांचे प्रवचन सेवा होईल.


