पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत शाळेच्या विकासाबाबत केले समाधान व्यक्त तर पाककृती स्पर्धेतील विविध पदार्थांची घेतली चव
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी या उपक्रमशील शाळेला राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेच्या सहकार्याने इंग्लंड येथील सुधाका सर व इमेन मॅडम यांनी भेट दिली. शालेय आवारात प्रवेश करताच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी केलेल्या स्वागताने दोघेही आनंदी झाले.
शाळेतील विविध उपक्रमांची माहिती मुख्याध्यापक केशव घुगे व उपाध्यापिका सुरेखा आंधळे मॅडम यांनी दिली.त्यात प्रामुख्याने डिजिटल शिक्षण, परसबाग,सोनू मोनू बचत बँक, पालकांच्या मदतीने सुरू असणारा मिष्टान्न भोजन उपक्रम,स्पर्धा परीक्षा तयारी, शाळेतील अंतर्गत व भौतिक सुविधा,शाळेत वर्षभर सुरू असणारे विविध उपक्रम यांची माहिती घेतली.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुकास्तरावरील तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले असल्याची माहिती शिक्षक व उपस्थित ग्रामस्थांनी याप्रसंगी दिली. विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधत गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले.
त्याचबरोबर शासन आदेशास अनुसरून शाळेतील सर्व माता पालकांनी तृणधान्यांचा वापर करत बनवलेल्या विविध पाककृतींची दोन्ही पाहुण्यांनी चव घेतली व परिक्षणही केले.या स्पर्धेत योगिता खरात प्रथम क्रमांक, रोहिणी खरात द्वितीय क्रमांक, राणी मुंतोडे तृतीय क्रमांक तर प्रतीक्षा खरात यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. विजेत्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेच्या वतीने बक्षिसे वाटप केली.
शाळेबाबत बोलताना ईमेन मॅडम यांनी लोकसहभाग व विविध सेवाभावी संस्थेच्या सहभागातून रामवाडी शाळेतील शिक्षकांनी पालकांच्या सहकार्याने केलेला कायापालट अविश्वसनीय असल्याचे मत व्यक्त केले.आणि रामवाडी शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले. तर सुधाका सरांनी शाळेच्या शेरेबुकात अतिशय सुंदर असा शेरा दिला.
यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेचे प्रमुख पाळंदे सर, संस्थेच्या मुख्य वित्ताधिकारी श्रीम. स्मिता पवार मॅडम,संस्थेचे प्रकल्प प्रमुख श्री .प्रदीप दारोळे,मंगल कदम,मंगल काळे,हर्षदा बागुल तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविना खरात, सदस्य संदीप खरात, योगिता खरात,रोहिणी खरात, तसेच जनार्दन खरात,सोमनाथ खरात,बाजीराव मुंतोडे,आनंदा खरात,स्वप्नाली भालेराव,मोहिनी खरात,सोनाली खरात, शितल खरात,सविता नागरे,भारती खरात,जयश्री खरात,सोनल खरात,स्वाती खरात,राणी मुंतोडे, काजल खरात आदी माता पालकांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

