पुन्य वार्ता
शिर्डी, दि. १६ – अकोले विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मतदान घडवून आणण्याचा संकल्प करत मतदार जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घेतला. बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली.
शहरातील मॉडर्न हायस्कूल, अगस्ती विद्यालय, कन्या विद्यालय, परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूल, माधवराव कोते अभिनव पब्लिक स्कूल, आणि वसुंधरा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ, नायब तहसीलदार किसन लोहरे, मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ, जया पोखरकर,अपर्णा श्रीवास्तव, खंडू बेळगावकर सतीश नाईकवाडे, डॉ.जयश्री देशमुख आदी उपस्थित होते.
