पुण्य वार्ता
प्रतिनिधी: संजय भाऊ गायकर
ब्राम्हणवाडा (अकोले)
ओतूर ते आळंदी महिलांची सायकल वारी!
दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी ओतूर ते आळंदी सायकलवारीचे आयोजन ओतूर महिला सायकल ग्रुपने केले होते.
महाराष्ट्रातील ओतुर आणि आळंदी यांदरम्यान महिला सायकल वारीचे आयोजन २८ जुलै रोजी करण्यात आले होते. या वारीचा उद्देश महिला सशक्तीकरण आणि पर्यावरणीय जागरूकता होता. या वारीत भाग घेणाऱ्या महिलांनी सायकल चालवून स्वास्थ्यसंबंधी फायदे आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली. कार्यक्रमात विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली आणि महिला सशक्तीकरणावर भाषण केले.
या इव्हेंटला मोठा प्रतिसाद मिळाला असून, सहभागींनी यशस्वीपणे या वारीचे आयोजन करण्यात आलेल्या स्थानिक समितीचे आभार मानले. वारीनंतर उपस्थित महिलांनी एकत्रितपणे पर्यावरणीय संदेश प्रसारित केला आणि सायकलिंगच्या लाभांवर चर्चा केली. हा इव्हेंट महिलांच्या समुदायातील एकतेचा आणि सशक्तीकरणाचा सुंदर उदाहरण ठरले आहे. भविष्यातील आयोजनासाठी आयोजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सविस्तर बातमी अशी आहे की ही सायकल वारी पहाटे ४ वाजता ओतूर वरून आळंदीच्या दिशेने निघाली. वारीत महिला,पुरुष,मुले अश्या सर्व वयोगटातील सायकलिस्ट मिळून एकूण ३२ सायकल स्वारांचा सहभाग होता.
ओतूर वरून निघाल्यापासून ते आळंदीपर्यंत पोहोचपर्यंत पूर्ण सायकलवारी ही पावसातच झाली.
या सायकलवारी मध्ये खूप जणांचे सहकार्य लाभले त्यामध्ये श्री.सुभाष लोहोटे बाबा यांनी त्यांची टेम्पो गाडी सायकली आणण्यासाठी अत्यंत अल्प दरात दिली. सौ.वैशाली तांबे मॅडम यांनी पूर्ण वारीसाठी पिण्याच्या पाण्याचे दहा बॉक्स स्वखर्चाने दिले.गीता डुंबरे मॅडम यांचे पाहुणे यांनी चाकण मध्ये सर्व ओतूर सायकल ग्रुपला उत्तम नाश्त्याची व्यवस्था केली, सायकलवारी आळंदीत पोचल्यानंतर सुरेखा ढमाले यांच्या भगिनी यांनी संपूर्ण सायकल ग्रुपला चिक्की वाटप करून सर्वांचे कौतुक केले. स्वाती-सोहम यूट्यूब चैनलचे सर्वेसर्वा स्वाती फापाळे व सोहम फापाळे यांनी प्रसार माध्यमामध्ये बातमी देण्यासाठी वारीची पूर्ण माहिती घेऊन सर्वांचे स्वागत आळंदी नगरीमध्ये केले.
श्री.अनिलदादा ढवळे, जयसिंग आण्णा डुंबरे, घाडगे बाबा, दत्ता पवार ह्यांची ही सायकल वारी साठी मदत झाली!
ओतूर सायकल ग्रुपच्या सर्व सदस्यांनी माऊलींचे दर्शन अगदी आनंदात घेऊन परतीच्या मार्गाला सुरुवात केली.
श्री.संतोषशेठ डुंबरे यांचे मित्र हॉटेल नीलमचे मालक यांनी सर्व ग्रुपसाठी अल्पदरात स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली.सर्वांनी आळंदी येथील प्रतिशेगाव गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला सुरुवात केली. मग येताना गाडीत रंगला हास्यविनोद,दिवसभरच्या सायकल वारीच्या गप्पागोष्टी त्यामध्ये श्री.छगन पानसरे सर यांनी भजन,अभंग म्हणून सर्व महिला भगिनींनी त्यांना आपल्या मंजुळ आवाजात साथ दिली,अविनाश गायकवाड व संतोषशेठ डुंबरे यांनीही ढोलकीची साथ दिली.
खूप छान पद्धतीने ही सायकल वारी पार पडली.
ज्यांनी ह्या सायकल वारी साठी मदत केली त्या सर्वांचे ओतूर सायकल ग्रुपच्या वतीने तसेच सायकल ग्रुपचे अध्यक्ष जयसिंग अण्णा डुंबरे व सचिव गणेशभाऊ डुंबरे यांच्याकडून आभार मानण्यात आले!

