पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी):-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगांव पाट या शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पुस्तके भेट म्हणून देण्यात आले.
*सावरगांव पाट शाळा ही आदर्श व उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते.स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे.शिष्यवृत्ती परीक्षा,नवोदय परीक्षा व मंथन परीक्षा यामध्ये शाळेने नेहेमीच यश मिळविले आहे.सर्वच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची पुस्तके घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली नसते,पण त्या विद्यार्थ्यांच्या अंगी गुणवत्ता असते.या विद्यार्थ्यांना मदत म्हणून गावचे तरुण जे पुढे येतात जे की,नोकरी निमित्ताने बाहेरगावी *आहेत. बायर क्रॉप सायन्स कंपनीचे* कमर्शिअल मॅनेजर गणेश सुखदेव पवार,इंजिनिअर संदीप शंकर पवार, संगमनेर कॉलेज चे प्राध्यापक अमोल रामदास पवार यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपत या विद्यार्थ्यांना पुस्तकांची मदत केली.भविष्य काळातही आम्ही गावच्या शैक्षणिक विकासासाठी
बांधील आहोत असे त्यांनी सांगितले.या सर्वांचे सावरगाव पाट ग्रामपंचायत व गावक-यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक भास्कर मोहिते,शिक्षक भगवान सहाणे,बाळासाहेब मुखेकर,सबाजी दातीर,पांडुरंग डगळे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
