पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
श्री लिंगेश्वर हायस्कूल व आर आर कानवडे ज्युनिअर कॉलेज लिंगदेव प्रशालेच्या खेळाडूंनी धांदरफळ बुद्रुक येथील मैदानावर अकोले तालुका तालुकास्तरीय शालेय गटाच्या मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळवत जिल्हास्तरावर घेतली गरुडझेप साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड संचलित श्री लिंगेश्वर हायस्कूल व आर आर कानवडे ज्युनिअर कॉलेज लिंगदेव आणि लालबहादूर शास्त्री विद्यार्थी वसतिगृह लिंगदेव प्रशालेच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी अकोले,तालुकास्तरीय वैयक्तिक मैदानी स्पर्धेत धांदरफळ येथे लौकिकास पात्र कामगिरी केली. यात 14 वर्षे वयोगट मुली कु. ईश्वरी दत्तात्रय शेटे हिने 100 मि. व 200 मि .धावणे खेळ प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. चौधरी संध्या रघुनाथ हिने 600 मीटर धावणे खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कु कृतिका पोपट चौधरी हिने 100 मीटर धावणे खेळ प्रकारात चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. 17 वर्षे वयोगटातून कु.अक्षदा उल्हास कानवडे हिने 100 मि. धावणे व 200 मीटर धावणे खेळ प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक,तसेच लांब उडी खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला कु.सायली समित घोमल हिने 800 मीटर धावणे व 400 मीटर धावणे खेळ प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु.जाधव श्रेया सतिश हिने 800 मीटर धावणे खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला . 17 वर्षे वयोगट मुली गोळा फेक या खेळ प्रकारात कु. सारंगी अण्णासाहेब हांडे हिने तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु.चौधरी हर्षदा लक्ष्मण 14 वर्षे गटात 400 मीटर धावणे खेळ प्रकारात तिसरा क्रमांक प्राप्त केला . 17वर्षे वयोगटात 400 मीटर धावणे खेळ प्रकारात कु.पवार सानिका उत्तम हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. 4/ 400, 4 /100 या या रीले प्रकारात 14 वर्षे वयोगट, 17 वर्षे वयोगट या दोन्ही गटात विद्यार्थिनींनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला
या सर्व खेळाडूंची 8 व 9 ऑक्टोबर 2024 रोजी लोणी (प्रवरानगर )येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली .सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री.सतीश भालेराव सर व श्री आशुतोष कर्पे सर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तालुकास्तरीय क्रीडा समिती, सर्व संस्था पदाधिकारी, प्रशालेचे प्रभारी प्राचार्य श्री. रवींद्र चौधरी सर, इन्चार्ज श्री. अनिलकुमार मंडलिक सर, वसतिगृह अधिक्षक श्री.एस.व्ही आंबरे सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. अशोक मुरादे सर, सर्व शिक्षक- शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, सर्व ग्रामस्थ , पालक लहित- लिंगदेव पंचक्रोशी यांचे वतीने अभिनंदन करण्यात आले.

