पुन्य वार्ता
अकोले: निळवंडे धरणाच्या निर्मितीत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे सर्वात जास्त योगदान असून आधी पुनर्वसन मग धरण असा पॅटर्न निळवंडेच्या रूपाने चर्चेत आला. निळवंडे धरणास मंञी मधुकररावं पिचड यांचे नाव द्या अशी मागणी भाजप जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली.
मुंबई येथे मंत्रालयात नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, अकोले एजुकेशन संस्था सचिव सुधाकर देशमुख, अकोले मंडल अध्यक्ष राहूल देशमुख, उपस्थित होते.
निळवंडेच्या निर्मितीस ५० वर्षे लागली, मधुकर पिचड यांची राजकीय कारकिर्द ७२ च्या दुष्काळानंतर सुरू झाली. १९९० च्या दशकात प्रत्यक्ष धरण बांधण्यास सुरूवात झाली. २०२३ ला कालव्यातून पाणी वाहिले अन् धरण पूर्णत्वास गेले. पिचड यांची राजकीय कालखंड व निळवंडे निर्मितीची कालावधी सारखाच, निळवंडे निर्मितीत पिचड यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळेच चार कालव्यांचे धरण अशी ख्याती आशिया खंडात निळवंडेची झाली आहे. संगमनेर- राहाता तालुक्यातील अनेक वर्षे तहानलेली गावे पाण्याखाली आली असून ही गावे आता बागायती होताना दिसताहेत.
संगमनेर येथे जलसंपदा मंञी राधाकृष्ण विखे यांना निवेदन देण्यात आले आहे.
