पुण्य वार्ता
डोंगरगाव प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत यंदाही भरघोस यश मिळवले आहे. या यशाने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यालयाचे यंदाचे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
1. सार्थक बाळू उगले – 94.80%
2. तनुष्का शांताराम उगले – 88.80%
3. अक्षदा संदीप दराडे – 86.60%
4. तपस्या ज्ञानेश्वर उगले – 85.40%
5. अक्षदा बाळासाहेब म्हस्के – 80.60%
या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीमती संगीता हासे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले असून, शिक्षक शशिकांत कातोरे, भास्कर वाळुंज, बाळू उगले, विजय भालेराव, राजेश सहाणे, कुरकुटे मॅडम, कुऱ्हाडे मॅडम तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रमपूर्वक योगदान दिले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्यध्यापिका,शिक्षक, ग्रामीण विकास मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत,सोसायटी,पतसंस्था सर्व संस्था आणि गावातील सर्व नागरिकांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
शतशः अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

