पुण्य वार्ता
वाशिम… येथील पत्रकार तथा श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले या निधनाने पगार कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला,. संपूर्ण राज्यात पत्रकार संघटनेचे सर्वात मोठे संघटन असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी 15 जून रोजी वाशीम येथे पगार कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा नेहमी पत्रकारांच्या दुःखात सहभागी होतो. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांनी पगार कुटुंबीयांबाबत प्रदेश सरचिटणीस आरोटे यांना संपूर्ण माहिती दिली यावेळी विश्वासराव आरोटे यांनी पगार कुटुंबीयांना दुःखाच्या या प्रसंगात धीर देत 11 हजार रुपये रोख व जीवनावश्यक किराणा साहित्य किट पत्नी जानवी नितीन पगार व पुत्र युगंधर पगार यांना भेट देऊ पत्रकार संघ नेहमी पाठीशी राहील असे आश्वासन दिले.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी, नाशिक संपर्कप्रमुख विजय शेळके, संजय फुलसुंदर,एडवोकेट सुरेश टेकाळे, संजीव भांदुर्गे, श्याम अपूर्वा, सामाजिक कार्यकर्ते गजानन धामणे व पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजी नगर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अधिवेशन यांची सांगता होताच पत्रकार प्रति असलेल्या आस्था व आपुलकीच्या भावनेमुळे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी सरळ वाशिम गाठले व पगार कुटुंबीयांचे सांत्वन केले. पत्रकार संघ व आरोटे यांच्या मायेच्या ओलाव्याने पगार कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरडले, यावेळी पत्रकार स्वर्गीय नितीन पगार यांच्या प्रतिमेला त्यांनी हर अर्पण करून श्रद्धांजली दिली. यावेळी पगार यांचे वडील व सासरे पत्नी व मुलगा उपस्थित होते.

