तालुका अध्यक्ष पदी अशोकराव उगले, तालुका कार्याध्यक्ष पदी दत्ता जाधव, तालुका सचिव पदी हरिभाऊ फापाळे यांची निवड
पुण्य वार्ता
युट्युब प्लॅटफॉर्म वरील पत्रकारांवर बंदीचा विचार केला तर राज्य पत्रकार संघाच्या वतीने आम्ही या विरोधात लढा देऊ,
सर्व पत्रकार बांधवांना लवकरच दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार – राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे!
अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची अकोले तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झालीअसुन अकोले तालुका अध्यक्ष पदी अशोक उगले यांची तर कार्याध्यक्ष पदी दत्ता जाधव,तालुका सचिव पदी हरिभाऊ फापाळे यांची तर उपाध्यक्ष पदी जगन्नाथ आहेर, हरिभाऊ आवारी, वसंत सोनवणे,ललित मुर्तडक,अशोक शेळके,सहसचिव पदी सचिन लगड यांची निवड करण्यांत आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सभा राज्य सरचिटणीस डॉ विश्वास आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लवकरच होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे तसेच शालेय वस्तूंच्या वाटपाचे नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरचिटणीस माननीय विश्वासराव आरोटे तसेच पत्रकार संघ अकोले सन्माननीय सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार बांधवाना मार्गदर्शन करताना पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे म्हणाले की मी पत्रकार बांधवांच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि पत्रकार बांधवांना दहा लाख रुपयाचे विमा संरक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. वेळोवेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे, मी स्वतः सर्व पत्रकारांसाठी जातीने लक्ष घातलेले आहे, भले तो पत्रकार कोणत्याही संपादकासाठी काम करत असाला किंवा पत्रकार संघाचा सभासद नसला तरी वेळप्रसंगी मी स्वतः खिशातले पैसे घालून त्या कुटुंबाला मदत केली आहे. कोरोना काळात तसेच अपघात प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकारांना वेळोवेळी आर्थिक मदत केलेली आहे.
सरकार सध्या युट्युब वरील पत्रकारांवर बंदीच्या विचारात आहे आणि आम्ही हे होऊन देणार नाही पत्रकार कोणत्याही क्षेत्रातला असला तरी तो समाजातील घटकांसाठीच आपले काम करीत असतो आणि युट्युब सारखे प्लॅटफॉर्म हे प्रभावी आहे. अशातच सरकार युट्युब पत्रकारितेवर बंदीचा विचार करत असताना आम्ही हे होऊन देणार नाही, लवकरच आम्ही ह्या निर्णया विरोधात सर्व पत्रकारांना घेऊन मंत्रालया पर्यंत लॉंग मार्च काढून याचा निषेध करणार आहे!
या वेळी पत्रकार परिषदेच्या अध्यक्ष पदी गणेश आवारी व रोटरी क्लब च्या अध्यक्ष पदी विद्याचंद्र सातपुते यांची निवड झाल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला. जेष्ठ मार्गदर्शक पत्रकार प्रकाश टाकळकर, रामलाल हासे, भाऊसाहेब मंडलिक, प्रकाश महाले, राजेंद्र उकिरडे, दादाभाऊ फापाळे,जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे,उत्तर महाराष्ट्र सचिव अनिल रहाणे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे,जिल्हा हल्ला विरोधी प्रमुख संतोष नाना साळवे,मराठवाडा संपर्क प्रमुख कुंडलिक वाळेकर,जिल्हा रजिस्टर हेमंत कुसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अकोले कार्यकारिणी मध्ये सरचिटणीसपदी प्रवीण धुमाळ,सह संघटक दत्ता हासे,राजेंद्र मालुंजकर, निवड समिती प्रमुख गणेश रेवगडे, इलेक्ट्रिक मीडिया प्रमुख सचिन खरात, सोशल मीडिया सचिव शुभम फापाळे, संघटक सुरेश देशमुख, प्रसिद्धीप्रमुख दत्तू जाधव, सुनील आरोटे, राजेंद्र राठोड, संपर्कप्रमुख संजय गायकर, प्रकल्प प्रमुख निलेश वाकचौरे, राज्य प्रचार प्रमुख संजय फुलसुंदर, खजिनदार भागवत खोल्लम, सोशल मीडिया प्रमुख सुनिल शेणकर, हल्ला विरोधी समिती शंकर संगारे, सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख ओंकार अस्वले , सोशल मीडिया प्रमुख पठार भाग सतीश फापाळे, रजिस्टार निखिल भांगरे याप्रमाणे कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
