पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी):-
अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा एकदरे येथे शाळा प्रवेशोत्सव व नवगतांचे स्वागत करण्यात आले.या निमित्ताने राजूर प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय सोनवणे हे उपस्थित होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.उपस्थित अधिकारी व पालकांच्या शुभहस्ते शाळेवर वृक्षारोपण करण्यात आले.शाळेमध्ये नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांवर पुष्प वर्षाव करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले.उपस्थित पालकांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
उपस्थित अधिकारी,पालक व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागतगीताच्या माध्यमातून स्वागत केले.
सहाय्यक प्रकल्पधिकारी संजय सोनवणे बोलताना म्हणाले की,शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा कमी पडणार नाही यासाठी शाळा प्रशासनाने काळजी घ्यावी.इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल व शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांनी कौतुक केले.एकदरे आश्रमशाळेचे पालकत्व माझ्याकडे असून,शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक विक्रम आरोटे,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रल्हाद नेहे,शिक्षक दत्ता जाधव,अनिल नवले,ललित छल्लारे, मच्छीन्द्र शिंदे,आसाराम कानकाटे,तुकाराम चोखंडे,प्रशांत बगणर,अधीक्षक विरेंद्र शिंदे,लोकेश लांडे श्रीमती उर्मिला शेळके,श्रीमती मनिषा धिंदळे,अधिक्षिका वर्षा सोनवणे,लक्ष्मण चंदगीर,बुधा मदगे,सचिन चंदगीर,आदींनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले तर आभार अनिल नवले यांनी मानले.

