पुन्य वार्ता
इगतपुरी : प्रतिनिधी
प्रत्येक निवडणुकीला लोकप्रतिनिधी आदिवासी समाजाचा आधार घेऊन निवडणुका जिंकतात मात्र ना विकास होतो ना समस्या सोडवितात.यंदा मात्र आदिवासी बांधवांचा उद्धार करून मतदार संघात सर्वच घटकातील नागरिकांच्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मतदारराजाने होतकरू व उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी अनिल गभाले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.
तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील विकास गेल्या १५ वर्षापासुन रखडला असुन शेतीमाल आणि पिकाला योग्य भाव नाही. बेरोजगारी, पिण्याचा पाणी प्रश्न, आरोग्य, पर्यटनाचा विकास, जनतेचे मुलभुत हक्क व विकासाचा मुद्धा सोडवला गेला नाही. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या आग्रहास्तव मी अनिल गभाले जनसंवादी पक्षाकडून उमेदवारी करतोय. मतदारसंघात मी विकासगंगा कायम वचनबद्ध राहणार आहे.
उद्या शुक्रवारी दि १५ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामदेवता घाटनदेवी मातेचा आशिर्वाद घेवुन घाटनदेवी मंदिरात श्रीफळ वाढवुन प्रचार रॅलीची सुरवात होणार आहे. प्रचार रॅलीचे रूपांतर खंबाळे येथे सांयकाळी ४ वाजता सभेत होणार आहे.यावेळी बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतिष पेंदाम यांचे प्रखर मार्गदर्शन या सभेत असुन आजही आदिवासी समाजावर अन्यायच होत असुन त्यांना जागृत करण्यासाठी खास या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या जाहीर सभेसाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील जनतेने हजारोंच्या संख्याने उपस्थित रहावे असे आवाहन उमेदवार अनिल गभाले यांनी केले आहे. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अनिल गभाले यांना प्रचंड मतांनी विजयी करा. निशाणी करवत समोरील बटन दाबुन मतदान करा अशी विनंती मतदार राजाला अनिल गभाले यांनी करून रॅली व सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन केले आहे.
