पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी)- तालुक्यातील रुंभोडी येथील वारकरी सांप्रदयातील गं. भा. पार्वताबाई रामनाथ मालुंजकर (वय 65 वर्षे) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांचे पश्चात सासु,एक मुलगा,दोन मुली, सून,जावई,दिर,जाऊ,पुतणे,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
एस.आर.फ्लॉवर्स चे संचालक ,फुलांचे व्यापारी,रोटरी क्लब अकोलेचे पर्यावरण डायरेक्टर संदीप मालुंजकर यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्यावर रुंभोडी येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील मान्यवर ,ग्रामस्थ, नातेवाईक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

