पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रेडे गावचे सर्वसाधारण कुटुंबातील अभ्यासू कष्टाळू व्यक्तिमत्व असलेले दीपक रामनाथ चौधरी सीए परीक्षा उत्तीर्ण झाले आपल्या स्वकर्तुत्वावर सीए परीक्षेचा अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन एक तरुणांना आदर्श घडविला आहे.
वडिल श्री रामनाथ चौधरी
आई. मंदाबाई रामनाथ चौधरी यांचे अथक परिश्रमाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले असे रेडे गावचे सरपंच लोकनियुक्त सरपंच प्रशांत बंदावणे यांनी सत्कार करताना व्यक्त केले.
दीपक हा गरीब घरातला मुलगा असून त्यांचे शिक्षण मराठी मिडीयम मधून झाले आहे.खरंतर शिक्षणासाठी जास्त पैसा लागतो त्यामुळे दीपक ने कोणतेही क्लास न लावता मेहनत आणी चिकाटीच्या जोरावर घरून अभ्यास करून आज ते सीए परीक्षा पास झाले .त्यांचा सत्कार रेडे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत बंदावणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष अक्षयजी आभाळे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व इमेज हॉलिडेज चे संचालक हरीभाऊ फापाळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खजिनदार अंकुशजी वैद्य ,भाजपचे युवा कार्यकर्ते शिवाजी पारासुर तसेच ग्रामपंचायत चे कर्मचारी श्री गणेश माताडे. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण चौधरी सदस्य संपत गायकवाड आदी मान्यवर होते.

