पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी) :मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी वीरगाव व तहसील कार्यालय अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अकोले तालुक्याचे तहसीलदार मा. डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार प्रमोद सावंत साहेब ,मंडल अधिकारी मा. बाबासाहेब दातखीळे, महसूल सहाय्यक अकोले डगळे , तलाठी अमोल गडाख ,तलाठी राहुल कवडे, संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सचिव डॉ.अनिल राहणे ,प्राचार्या डॉ. पल्लवी फलके-कोटकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांना मतदान जागृती या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा,हस्तकला स्पर्धा,निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोस्टर बनवणे स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तहसील अकोले व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांच्या सहयोगाने कार्यक्रम संपन्न झाला.
