पुण्य वार्ता
प्रतिनिधी (श्री दत्तू जाधव):-अकोले तालुक्यातील अंबड येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही भव्य दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने १४ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते ७ या वेळी अभिषेक दुपारी ४ ते ६ या वेळी संगीत भजन हे भ प सखाराम महाराज डोखे सायं ६ ते ७ हरिपाठ ७ वाजून ३ मिनिटांनी दत्त जन्म सोहळा व महाआरती ७ वाजून १५ ते ८ वाजुन १५ मिनिटांपर्यंत ह भ प कैलास महाराज आहेर यांचे प्रवचन रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी महाआरती नंतर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे रात्री ९ ते ११ पर्यंत हनुमान भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे १५ डिसेंबर रोजी सकाळी दत्त मुर्तीचा अभिषेक त्या नंतर सत्यनारायण महापूजा गुरूचरित्र पारायण हरिपाठ व रात्री ७ ते ८ ह भ प अरूण महाराज शिर्के यांचे प्रवचन व महाआरती व त
यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल व नंतर भजन कार्यक्रम होईल तसेच १५ डिसेंबर रोजी नारायण पुर येथे जाण्यासाठी भाविकांना एस टी बसची व्यवस्था करण्यात आली आहे तरी या दत्त जयंती सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दत्त सेवेकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
