पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनीधी)- हिंद सेवा मंडळ संचलित मॉडर्न हायस्कूल अकोले येथील सेवानिवृत्त शिक्षक ॲड.श्रीकृष्ण गीते यांचे चिरंजीव डॉ. सौरभ श्रीकृष्ण गिते यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथून MD (आयुर्वेद) ही पदव्युत्तर परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. सौरभ गिते हे ॲड. श्रीकृष्ण चांगदेव गिते व माणिक श्रीकृष्ण गिते यांचे सुपुत्र असून डॉ. सुशांत श्रीकृष्ण गिते यांचे बंधू आहेत. त्यांनी आपले BAMS आणि MD चे शिक्षण यशवंत आयुर्वेद महाविद्यालय, कोडोली (कोल्हापूर) येथून पूर्ण केले आहे. शालेय शिक्षण दिगंबर गणेश सराफ विद्यालय, संगमनेर आणि महाविद्यालयीन शिक्षण सह्याद्री ज्युनियर कॉलेज, संगमनेर येथे झाले.
त्यांच्या यशाबद्दल ॲड .श्रीकृष्ण गिते, माणिक गिते, डॉ. मयुरी सौरभ गिते, डॉ. सुशांत गिते, डॉ. सोनाली सुशांत गिते, डॉ. विष्णुपंत भंडारे, डॉ. स्मिता भंडारे, उदयकुमार खैरनार, मोहिनी खैरनार, डॉ. निलेश सातपुते, डॉ. अमोल वालझाडे, डॉ. विकास करंजेकर, डॉ. सोमनाथ मुटकुळे, डॉ. विनायक नागरे, डॉ. शरद गुंजाळ, डॉ. संदीप वामन,अनिल वैद्य यांचेसह विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. सौरभ गिते आणि डॉ. मयुरी सौरभ गिते यांचे क्लिनिक ‘साईश्रद्धा चौक, घुलेवाडी रोड, संगमनेर’ येथे कार्यरत असून, त्यांनी स्थानिक नागरिकांसाठी उत्तम वैद्यकीय सेवा देण्याचा वसा घेतला आहे.
