पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनीधी)- पिचड पिता- पुत्र नाशिक येथे रुग्णालयात असताना त्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या पिचड समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वैभवराव पिचड यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
पिचड समर्थक कार्यकर्त्यांनीच हाती घेतली असल्याने महायुती दुभंगल्यातच जमा आहे.
माजीमंत्री मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने ते नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.त्यांची प्रकृती स्थिर परंतु गंभीर आहे.त्यांचे पुत्र माजी आमदार वैभवराव पिचड व त्यांचे कुटुंबीय त्यांच्या बरोबरच आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाली व पिचड पिता पुत्र रुग्णालयात असल्याने त्यामुळे त्यांचे समर्थक निवडणूकीबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत त्यांच्यात अस्वस्थता होती. या पार्श्वभूमीवर पिचड समर्थक कार्यकर्त्यांची आज अकोले येथे भाजप तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. तातडीने आयोजित केलेल्या या बैठकीस मतदार संघातील मुळा,प्रवरा,आढळा, आदिवासी भाग व पठार भागातील प्रमुख व सर्व सामान्य कार्यकर्ते स्वयं स्फूर्तीने उपस्थित होते.
या बैठकीत आक्रमकपणे भाषण करताना वैभवराव पिचड यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली.
कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात माजी मंत्री मधूकरराव पिचड यांनी तालुक्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला.मतदार संघात त्यांच्या काळात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी अडविले गेले, खेड्यापाड्यात वीज पोहोचली,रस्त्यांचे जाळे निर्माण झाले.प्रत्येकाच्या शेतीत पाणी पोहोचल्याने सर्वांची प्रगती झाली. व्यापार वाढली,आर्थिक उलाढाल वाढली,व्यापार वाढला.शिक्षण क्षेत्रात अनेक सुविधा निर्माण झाल्या. त्यांनी प्रत्येकाला बरोबर घेऊन आज पर्यंत काम केले आहे आज माजी मंत्री पिचड हे गंभीर आजाराला झुंज देत असतांना त्यांचे पुत्र माजी आमदार वैभवराव हे त्यांच्या सेवेत असून त्यांची निवडणूक लढविण्याची मानसिकता नाही.मात्र वैभवराव पिचड यांनी निवडणूक लढवावी या साठी व त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या अनुपस्थितीत पिचड पिता पुत्राने केलेल्या कामाबद्दल त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची वेळ आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर आली. आहे.निवडणुकीत ते सहभागी होत नसले तरी कार्यकर्त्यांनीच आपणच निवडणुकीला उभे आहे असे समजून निवडणूक हाती घ्यावी. असा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला.
यावेळी कार्यकर्त्यांनी कोणीही पैशाची अपेक्षा न बाळगता स्वतःहून आर्थिक मदत करण्याचे ठरविले.यावेळी कैलास जाधव या कार्यकर्त्याने 25000/- निवडणूकीसाठी देण्याचे जाहीर केले.
ही बैठकीचे ऐतिहासिक बैठक असा उल्लेख करीत 1995 ची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार कार्यकर्ते यांनी केला.
यावेळी बैठक संपल्यावर सर्व कार्यकर्ते अगस्ति आश्रमात गेले व तेथे पिचड यांना लवकर बरे वाटावे या साठी सामुदायिक प्रार्थना केली.
पिचड पिता पुत्राने कधीही जाती वाद केला नाही,कोणाशीही दुजाभाव केला नाही विरोधकांनाही अडचणीत मदत केली. वैभवराव पिचड यांना निवडून आणण्यासाठी सर्व विरोधकांना विनंती करावी,सर्वानी आपल्या भागातील, गावातील मतभेद दूर करून सर्वाना वैभवराव पिचड यांना आमदार करण्यासाठी आवाहन करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
पिचड यांनी ते ज्या ज्या पक्षात होते त्या पक्षाचे काम अतिशय प्रामाणिकपणे केलेले आहे. यावेळी सर्वानी आपणच पिचड साहेब,वैभवराव पिचड आहोत अशी भावना ठेवून कार्यकर्ते कामाला लागणार असल्याचे यावेळी दिसून आले.
अनेक संस्था आपल्याकडे असताना, 50 ते 60 हजार कार्यकर्ते पिचड कुटुंबाबरोबर असताना वैभवराव पिचड यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहणे ही बाब बरोबर नाही.त्यामुळे वैभवराव पिचड यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी अशी भूमिका घेत त्यांनी फक्त निवडणुकीचा अर्ज भरून साहेबांच्या सेवेला जावे आम्ही सर्व निवडणूक हाती घेतली असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ,गिरजाजी जाधव, सीताराम भांगरे,कैलास जाधव,काळू भांगरे,कविराज भांगरे, कासम मणियार,राम तळेकर, बाळासाहेब साबळे,अर्जुन गावडे,रंगनाथ कोठवळ,बाबासाहेब उगले,सोमनाथ मेंगाळ, बाळासाहेब सावंत,अमोल कोते ,रमेश राक्षे,संतोष आंबरे ,भरत घाणे यांनी मनोगते व्यक्त केले.यावेळी सर्व कार्यकर्ते अतिशय भावुक झाले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट -बैठकीनंतर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी म्हणून अकोले ते अगस्ति आश्रम अशी भव्य मोटार सायकल व चार चाकी वाहनांची रॅली काढत पिचड यांच्या प्रकृतीसाठी अगस्ति महाराजांकडे प्रार्थना केली.



