पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अकोले शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या गुणवंत शाखा अधिकारी मंगेशजी राक्षे साहेबांचा वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अकोले पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरज चव्हाण साहेब यांनी दैनिक समर्थ गांवकरी कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गांवकरी चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते मंगेश राक्षे साहेबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मनोज मोरे, दैनिक समर्थ गांवकरी चे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर आणि नामवंत प्रगतशील शेतकरी कैलास आप्पा आरोटे उपस्थित होते.
मंगेशजी राक्षे यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट सेवा देत बँक ऑफ महाराष्ट्राच्या गुणवंत शाखेचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करत, दैनिक समर्थ गांवकरी समूहाने त्यांचा विशेष सन्मान केला.
सत्कार सोहळ्यानंतर सुरज चव्हाण साहेबांनी कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाबद्दल तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना याबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी दैनिक समर्थ गांवकरीच्या कार्यालयाला दिलेली सदिच्छा भेट ही विशेष कौतुकास्पद ठरली.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी मंगेश राक्षे आणि सुरज चव्हाण यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


