पुण्य वार्ता
अकोले ( प्रतिनिधी ) येथील आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू फिजा सय्यद हिला अहिल्यानगर जिल्हा क्रीडा पुरस्कार घोषित झाला आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी खुरगे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सॉफ्टबॉल क्रीडा प्रकारात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन २०१९ – २० या वर्षीचा जिल्हा क्रीडा पुरस्कार फिजा फत्तू सय्यद हिला घोषित केला आहे.
१मे महाराष्ट्र दिनी अहिल्यानगर येथे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
फिजा सय्यद ही सॉफ्टबॉल खेळाडू असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. तिच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार घोषित झाला असून तिचे या बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
