पुन्य वार्ता
टाकळी (अकोले)- अकोले येथील सामाजिक कार्यकर्ते व स्टार मोबाईल शाॅपीचे संचालक समीर सय्यद यांनी शाळा प्रवेशोत्सव दिनाचे औचित्य साधून त्यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्याचे वाटप केले. त्यांच्या या दातृत्वशील स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समीर सय्यद व त्यांचा मित्र परिवार नेहमीच सामाजिक व शैक्षणिक सेवाभावी उपक्रमांमध्ये योगदान देत असतो. संवेदनशीलता जपून सय्यद परिवाराने राबविलेल्या नवोपक्रमासाठी अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, देवठाण बीट शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, टाकळी केंद्र प्रमुख रोहिणी खतोडे, केंद्र मुख्याध्यापक डॉ.श्रीनिवास पोतदार, सहशिक्षिक संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे, संजय शिंदे, निता लेंभे यांनी सय्यद परिवाराचे अभिनंदन केले आहे. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टाकळी केंद्रातील उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक समशिर शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने टाकळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक, तरूण मित्र मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
