पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी – आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून समाजकार्य करणारे अकोले चे भूमिपुत्र,यशस्वी उद्योजक,प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग कंपनी चे डायरेक्टर तथा मालक माणिकराव डावरे यांनी अकोले आय टी आय ला प्रॅक्टिकल साठी 1 लाख रुपये किमतीचे हॅक सॉ मशीन भेट दिले.
यावेळी कंपनीचे डायरेक्टर माणिकराव डावरे,दीपक तारगे,
अनुराग सेठ जैद – सभापती, खेड कृषी उत्पन्न समिती,
संतोष सेठ पवळे उद्योजक ,
नितीन सेठ कड उद्योजक ,
पंडित सेठ कड उद्योजक , नितीन म्हसे,उद्योजक,
प्रमोद सर आठले ( इंडस्ट्रियल कन्सलटन्ट)
सेवा निवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, भारत पिंगळे, शांताराम वैद्य,जि.प.प्रा.
शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष रवींद्र वैद्य,सदस्य योगेश वैद्य,शिक्षक श्री.ढोले सर, इंदोरी विद्यालयाचे सेवा निवृत्त मुख्याध्यापक शांताराम मालुंजकर,निंब्रळ विद्यालयाचे मुख्याध्यापक संभाजी सहाणे, आय.टी.आय चे प्राचार्य अरुण भालेराव,निदेशक पी.बी.नवले, दौलत धुमाळ, कंपनी चे मॅनेजर तथा अधिकारी किरण थोरात,अजित डावरे,तुषार वाडेकर, सुधीर डावरे,आकाश डावरे,आदीसह उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत आय टी आय प्राचार्य अरुण भालेराव, निदेशक पी.बी.नवले,दौलत धुमाळ,यांचे कडे सुपूर्त केले.

तालुक्यातील निंब्रळ गावचे भूमिपुत्र,
यशस्वी उद्योजक माणिकराव डावरे यांनी परिश्रम,जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर चाकण येथे स्वतःच्या मालिकीची प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग कम्पनी सुरू केली.गावाकडची नाळ कायम ठेवत अकोले तालुक्यातील अनेक होतकरू तरुणांना नोकरीची संधी दिली.दरवर्षी कायम विना अनुदानित तत्वावर चालू असलेल्या अकोले आय.टी. आय.ला प्रॅक्टिकल साठी 40 ते 55 हजार रुपयांचे रॉ मटेरियल भेट देतात.ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी चे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने 65 हजार किमतीचे सी ओ टू वेल्डिंग मशीन भेट दिली.या शिवाय कंपनीमध्ये प्रशिक्षण,औद्योगिक सहलीच्या निमित्ताने भेटी साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात.अनेक शाळांना त्यांनी शैक्षणिक साहित्य,इंटराक्टिव्ह पॅनल,टी.व्ही. स्वरूपात मदत केलेली आहे.त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून कोरोना काळात व त्यापूर्वी पासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या व कायम विना अनुदानित असलेल्या अकोले आय टी आय ला त्यांनी दरवर्षी मटेरियल देऊन मोठी मदत केलेली आहे.
पुन्हा आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी अकोले आय टी आय ला सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे हॅक- सॉ मशीन भेट दिले. त्याबद्दल संस्थेचे कार्यकारी विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड,कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, विश्वस्त मधुकरराव सोनवणे, सुरेशराव कोते,संपतराव वैद्य,अध्यक्ष सुनील दातीर,सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, खजिनदार धनंजय संत,सर्व कार्यकारिणी सदस्य, शिक्षणाधिकारी संपतराव मालुंजकर,प्राचार्य अरुण भालेराव व सर्व निदेशक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व आभार मानले.
चौकट- आय टी आय चे प्राचार्य अरुण भालेराव यांनी रोटरी क्लब अकोले चे अध्यक्ष ,सेवा निवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांचे कडे मशीन मिळावे म्ह्णून विनंती पत्र दिले.मात्र रोटरी क्लब ला मशीन ची किंमत जास्त असल्याने शक्य झाले नाही.मात्र रोटरी क्लब चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी उद्योजक माणिकराव डावरे यांना विनंती करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मशीन देण्याविषयी आग्रह धरला. त्यांच्या विनंती ला मान देऊन वाढदिवसाचे औचित्य साधून सदर संस्थेस मशीन भेट दिले.

