पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी:-(श्री दत्तू जाधव)अकोले तालुक्यातील अंबड येथील ओम साई बचत गट धनश्री बचत गट व दत्त बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक उत्सवासाठी लेझीम बक्षीस देण्यात आले
तीनही बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन प्रत्येकी पन्नास रुपये काढून लेझीम खरेदी करण्याचा एकजुटीने निर्णय घेतला गावातील सार्वजनिक उत्सव तसेच शालेय कार्यक्रमासाठी ह्या लेझीमचा वापर करण्यात येणार आहे महिलांच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे सध्याच्या काळात मोबाईल व्हाट्सअप मुळे तरुण पिढी महिला त्यामध्ये कायमच मग्न असतात त्यामुळे मानवी जीवनावर त्याचा फार मोठा परिणाम झाला आहे याकडे दुर्लक्ष होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मैदानी अथवा अन्य खेळाकडे मन वळवण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ बनविण्यासाठी अंबिका माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षक कैलास कोते यांनी पुढाकार घेतला आहे त्यांना पाठबळ देण्यासाठी गावातील बचत गटाच्या महिला पुढे सरसावल्या आहेत दत्त मंडळाच्या गणेश मित्र मंडळाच्या वतीनं महाआरती कार्यक्रम संपल्यानंतर नवीन लेझीमची पुजा करण्यात आली त्यानंतर महिलांना लेझीमचे प्रशिक्षण देण्यात आले
यावेळी गावच्या सरपंच रेश्माताई कानवडे दत्त गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष विलास जाधव सदस्य निलेश नाईकवाडी राजेंद्र भोर उत्तम कानवडे अमोल कानवडे नवनाथ कोल्हाळ मोहन भोर संदिप जाधव राहुल जाधव राहुल कोल्हाळ श्रीधर भोर प्रविण भोर दामू भोर विजय भोर संजय कोल्हाळ नवनाथ भोर एकनाथ भोर संपत भोर सूरेश भोर मुरली उघडे विकास जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
