पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन संस्थेच्या मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी वीरगाव ता.अकोले येथील पदवी अभ्यासक्रमातील ०८ विद्यार्थ्यांची सन फार्मास्युटिकल लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड झाल्याची माहिती प्राचार्या डॉ. पल्लवी फलके-कोटकर यांनी दिली. सन फार्मास्युटिकल लिमिटेड या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्य मुलाखातीत मातोश्री राधा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील बी फार्मसी अभ्यासक्रमातील ०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.या विद्याथ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. रावसाहेब वाकचौरे, सचिव डॉ.अनिल रहाणे , सौ. सुप्रिया वाकचौरे, सौ. गीता रहाणे व सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.
मातोश्री राधाच्या माध्यमातून अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध विषयाचे ज्ञान मिळते. यामुळे मुलाखतीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळते. प्लेसमेंट विभाग, माजी विद्यार्थी आणि महाविद्यालयाने केलेल्या विविध करारामुळे महाविद्यालयांमधील प्लेसमेंट ही वाढत आहे. याशिवाय संस्थेच्या माध्यमातून देखील त्यांना विविध विषयाचे माहिती देण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले जाते यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आज जागतिक पातळीवर पोहचत आहे.
