पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी –
अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या निवडणूकित शेतकरी विकास मंडळाचे सर्वच्या सर्व उमेदवार चांगली मते मिळवून विजयी झाले आहे.तर ३ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहे.
अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या १२ जागा साठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर शेतकरी विकास मंडळाच्या महिला राखीव प्रवर्गातुन साै.नाईकवाडी हिरा संतोष,साै.
झोळेकर विमल नारायण व अनुसूचीत जाती/जमाती प्रवर्गातुन जगताप दिनकर गंगाराम हे तिन उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गाच्या ८ जागेसाठी शेतकरी विकास मंडळाचे ८ व विरोधी ०३ असे एकुण ११ उमेदवार तर इतर मागास प्रवर्गच्या १ जागेसाठी ०३ उमेदवार व भटक्या जाती जमाती /विशेष मागास प्रवर्गच्या ०१ जागेसाठी ०३ उमेदवार राहिल्याने आज १३ एप्रिल २०२५ रोजी कन्या विद्यालयात शांततेत मतदान झाले यावेळी सर्वसाधारण गटात एकुण १०७५ मतदान झाले त्यापैकी ४९ मतपत्रिका अवैद्य तर १०२६ वैध मतपत्रिकाची मतमोजणी होऊन यामध्ये सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटातुन शेतकरी विकास मंडळाचे गायकवाड अनिल धोडिंबा ७२१ मते(विजयी) धुमाळ उत्तम रामभाऊ -७८८ मते (विजयी), धुमाळ गंगाराम पुंजा -६९७ मते (विजयी) धुमाळ वसंत सयाजी – ७९५ मते (विजयी),नवले मिलिंद भाऊसाहेब – ८५५ मते (विजयी),नवले सुनिल मनोहर- ८१२ मते (विजयी),मंडलिक एकनाथ बारकु -६९२ मते (विजयी), शेणकर दत्ताञय विठ्ठल- ७२९मते (विजयी) झाले तर अपक्ष उमेदवार गोर्डे हाैशिराम भास्कर -३८५ (पराभूत),नाईकवाडी संतोष भिमाजी -(११४ मते)(पराभूत),शेटे सीताराम विठ्ठल -(३५५ मते) (पराभूत) तर इतर मागास प्रवर्गातुन शेतकरी विकास मंडळाचे चाैधरी रामहारी भाऊसाहेब यांना ७०९ मते पडून विजयी झाले तर अपक्ष चाैधरी सावळेराम तुळशीराम- (२५० मते)(पराभूत) शेटे संपत गणपत (५४ मते)(पराभूत) तसेच भटक्या जाती /जमाती विशेष मागास प्रवर्गातुन शेतकरी विकास मंडळाचे दराडे हेमंत भिकाजी हे ५८५ मते मिळवून विजयी झाले तर त्यांच्या विरूद्ध चांगली लढत देणारे अपक्ष उमेदवार विजय बाबुराव पवार यांनी ३८९ मते मिळवून पराभूत झाले तर दुसरे अपक्ष पवार किसन सावळेराम हे ३६मते घेऊन पराभूत झाले आहे .
अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या या निवडणूकीत शेतकरी विकास मंडळाचे जेष्ठ नेते श्री मधुकरराव नवले,श्री शिवाजीराजे धुमाळ, डॅा.अजित नवले,शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ,श्री महेशराव नवले,ॲड.के.डी.धुमाळ,श्री.
भाऊपाटील नवले,श्री. संदिप दादा शेटे, रमेशराव जगताप,नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब वडजे,श्री.बाळासाहेब ताजणे,श्री. बाळासाहेब नाईकवाडी, श्री. प्रकाश नाईकवाडी,श्री. प्रमोद मंडलिक,रघुनाथ शेणकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली होती व या निवडणूकीत शेतकरी विकास मंडळाच्या सर्व उमेदवारांनी एकतर्फी यश मिळवले आहे.या विजयानंतर कार्यकर्तेनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
ही निवडणूक व मतमोजणी प्रक्रियेचे श्री योगेश नारायण कापसे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले त्यांना सोसायटीचे सचिव श्री रावसाहेब भावका नवले यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
त्यांना भरत झोळेकर,कचरू गोर्डे,नंदकुमार गजे,विवेक आहेर,संदीप आरोटे,भागवत सहाणे,अशोक घोमल,अशोक कासार,माधव जाधव,विकास जाधव,निलेश आंबरे आदींनी सहकार्य केले.
या उमेदवारामध्ये
माजी चेअरमन म्हणून
उत्तमराव धुमाळ,
अनिल गायकवाड,
वसंतराव धुमाळ,
गंगाराम पुंजा धुमाळ यांनी पद भूषविलेले आहे.

