पुण्य वार्ता
वैदिक शेती,समृद्ध शेतकरी
हा प्रवास आहे …..
एक युवा शेतकरी,ते एक यशस्वी उद्योजक ,उद्योजक तो असतो जो आपल्या सोबत अनेक तरुणाच्या हाताला काम उपलब्ध करून देतो.
लहरों से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
अजात शत्रू,हसतमुख असे व्यक्ती महत्त्व,
मा.शेखर रमेशराव वाकचौरे हे गेली 10 वर्ष सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक या मिशन सोबत शेतकऱ्यांना शाश्वत व समृद्ध शेतीचा मूलमंत्र देत आहेत,शेतकऱ्यांना केमिकल रुपी मोहजालातून बाहेर काढण्या साठी ते रात्रंदिवस शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन मार्गदर्शन करतात.
मिट्टी बलवान,फसल पैलवान,किसान धनवान और ग्राहक आरोग्यवान ,
हे ब्रिद हृद यासी बाळगुन ते आपला प्रवास मार्गक्रमण करत आहेत.अगदी कमी वयात आपल्या स्वतःच्या शेतीत विविध प्रयोग करत ,आपल्या कौशल्याचा त्यांनी पंचक्रोशीत ठसा उमटवला , स्वतःच्या शेतीत डाळिंबाचे यशस्वी उत्पन्न व उत्पादन घेऊन नाशिक मार्केट मध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली, त्यांचा कृषी क्षेत्रातील सखोल ज्ञानाचा खजिना त्यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे ठरविले व Soil चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक या मिशन सोबत त्यांनी स्वतःला वाहून घेतले,
स्वतःच्या शेती पासुन सुरुवात केलेला प्रवास आज त्यांनी अहील्यानगर,बीड,पुणे व नाशिक जिल्ह्यात विस्तारला .त्यांनी हजारो शेतकर्यांची शेती सुजलाम् सुफलाम् केली .
वाकचौरे सरांनी आपल्या सोबत 100 ते 150 शेतकऱ्यांच्या मुलांना देखील शेतीचे धडे देऊन त्यांना देखील व्यवसायात सक्षम उभे केले.
अश्या या झिरो ते हिरो असा प्रवास करणाऱ्या हरहुन्नरी व्यक्ती महत्वास मानाचा सलाम व त्यांच्या या समाजकार्यास खुप खुप शुभेच्छा….
