पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी)- अकोले रोटरी क्लब समवेत महिलांच्या ‘ स्वामिनी रोटरी क्लबचे सहकार्य घेऊन गरीब,वंचित महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणार असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी केले.
रो. निलेश देशमुख यांच्या परखतपुर येथील फार्म हाऊस वर रोटरी सदस्यांच्या कुटुंबासमवेत स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी सर्व रोटरीयन सदस्य कुटुंबासह उपस्थित होते.
सुरुवातीला प्राचार्य डॉ.संजय ताकटे यांनी सर्वांचे स्वागत केले.पब्लिक इमेज डायरेक्टर ह.भ.प. दीपक महाराज देशमुख यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
यावेळी अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी रोटरी क्लबचे सदस्य यांचे कुटुंबातील महिलांना आपले पती रोटरीमार्फत समाजासाठी काय कार्य करीत आहे. याचे अनेक उदाहरणे देऊन माहिती दिली. समाजाभिमुख काम करताना गरीब वंचिताची सेवा घडते.त्यांचे आशीर्वाद आपल्या रोटरी परिवाराला,मुला-बाळाला मिळतात. त्यातून समाजासाठी काम करण्याची प्रेरणा, प्रोत्साहन मिळते. आम्ही सर्व भाग्यवान आहोत की, ही समाजसेवा करण्याची संधी रोटरी च्या माध्यमातून आपल्याला मिळाली.आम्ही सर्व सदस्य रोटरीच्या माध्यमातून काम करताना सर्व सदस्यांना त्यांच्या सौभाग्यवतीची मिळणारी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष साथ ही फार मोलाची आहे.गरीब वंचितांच्या चेहऱ्यावरील हास्य हे आपल्या कामाचे खरे समाधान असून समाजात छोटे छोटे प्रश्न या माध्यमातून सुटतात ही रोटरी क्लब ची जमेची व समाधानाची बाब आहे.असे मत व्यक्त करताना रोटरी च्या माध्यमातून काम करताना कसे समाधान मिळते याचे अनेक उदाहरणे देऊन व आलेले अनुभव आणि रोटरी क्लबच्या कार्याचा आढावा अध्यक्ष सातपुते यांनी घेतला.
युवराज देशमुख यांनी सुंदर गीते सादर केली.
शेवटी उपस्थितांनी रोटरी क्लब च्या कुटुंबातील महिलांनी बनविलेल्या स्वादिष्ट व रुचकर स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व सदस्य व महिलांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी असा स्नेह मेळावा दर तीन महिन्यांनी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सेक्रेटरी अमोल देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.
